शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

एनआयए आरोपपत्र दाखल करणार!

By admin | Published: December 31, 2015 1:16 AM

मालेगाव २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करून चार वर्षे उलटले तरीही अद्याप या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.

मुंबई : मालेगाव २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करून चार वर्षे उलटले तरीही अद्याप या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. जानेवारी अखेरपर्यंत या बॉम्बस्फोटातील आरोपींवर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता विशेष सरकारी वकिलांनी वर्तवली आहे. ‘जानेवारी अखेरपर्यंत एनआयएचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे. अंतिम अहवाल एनआयएच्या दिल्ली मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. दिल्ली मुख्यालयाने परवानगी दिल्यानंतर हा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्यात येईल,’ अशी विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी दिली. मालेगाव २००८ बॉम्बस्फोटामध्ये जहाल उजव्या हिंदू संघटनेचा हात असल्याचा दावा एनआयएचा आहे. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय व अन्य नऊ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र राज्य दशहतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २०११ मध्ये एनआयएकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यास अतिविलंब झाल्याने आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच काही आरोपींनी मोक्का लागू केल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या केसमधील साक्षीदार एकाच ठिकाणी स्थिर नसल्यानेही या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याचे अ‍ॅड. रसाळ यांनी सांगितले. जून २०१५ मध्ये तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी एनआयएने त्यांना ही केस फारशी गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती दिली होती. एनआयएकडे ही केस वर्ग केल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत एकही कागदपत्र सादर न केल्याचा आरोपही सॅलियन यांनी केला. प्रसाद पुरोहित, राकेश धावडे, दयानंद पांण्डे आणि रमेश उपाध्याय यांची अखंड हिंदू राष्ट्र विचारधारा तसेच अल्पसंख्यांकांविरुद्ध असलेल्या द्वेषाबाबत विशेष मोक्का न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. तसेच साध्वीची यात महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हणत विशेष न्यायालयाने तिलाही जामिन देण्यास नकार दिला.