शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
4
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
5
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
6
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
7
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
8
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
9
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
10
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
11
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
12
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
13
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
14
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
15
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
16
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
17
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
18
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
19
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
20
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर

‘एनआयए’चे अधिकारी झाले बांधकाम मजूर

By admin | Published: January 29, 2016 1:46 AM

इसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेखला पकडण्यासाठी, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आणि मुंबई दहशतवादविरोधी पथक (एटीएस) च्या अधिकाऱ्यांनी, बिगारी कामगार

- जितेंद्र कालेकर, ठाणेइसिसचा भारतातील म्होरक्या मुदब्बीर शेखला पकडण्यासाठी, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आणि मुंबई दहशतवादविरोधी पथक (एटीएस) च्या अधिकाऱ्यांनी, बिगारी कामगार आणि सामान्य मुस्लिमांचे वेश परिधान करून दिवसभर मुंब्रा येथे तळ ठोकला होता. दरम्यान, ‘हवाला’मार्फत मिळालेले आठ लाख रुपये मुदब्बीरने इसिसच्याच कामासाठी वापरल्याची कबुली दिली असून, यापूर्वी खासगी कंपनीची नोकरी सोडताना मिळालेल्या रकमेतून तो घरखर्च भागवायचा, अशी माहिती ‘एनआयए’च्या तपासात उघड झाली आहे.गेले सहा महिने ज्याच्यावर पाळत होती, त्या मुदब्बीरला पकडण्याचा २१ जानेवारी २०१६ हा दिवस निश्चित झाल्यावर, मुंब्रा येथील अमृतनगर भागात ‘एटीएस’ आणि ‘एनआयए’च्या बड्या अधिकाऱ्यांनी वेशांतर करून तळ ठोकला होता. कोणी बिगारी कामगार होऊन फेरफटका मारत होता, तर कुणी सामान्य मुस्लीम नागरिकाचा वेश करून पानटपरीवर पान खात होता. दिवसभरात मुदब्बीर ज्यावेळी बाहेर पडला, त्यावेळी त्याच्या सर्व हालचाली टिपल्या जात होत्या. तो राहत असलेल्या ‘रेश्मा’ अपार्टमेंटच्या खालीही ‘वॉच’ ठेवला होता. सायंकाळी ६.३० वाजता तो नमाज पढण्यासाठी बाहेर पडला. ७ वाजता तो परतला. रात्री ८ वाजता त्याने दूध विकत घेतले. दूध घेऊन तो घरात गेल्यानंतर तो घरातच असल्याची पक्की खबर दिल्लीपर्यंत गेली. मुंब्य्रासारखी संवेदनशील वस्ती, यापूर्वी कोम्बिंग आॅपरेशनला आलेले अपयश आणि मुदब्बीर हा इसिससारख्या अतिरेकी संघटनेचा संशयित म्होरक्या असल्यामुळे त्याच्याकडे शस्त्रास्त्र किंवा स्फोटके असण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेची सुसूत्रबद्ध योजना आखण्यात आली. २२ जानेवारीच्या पहाटे २.३० ची वेळ अटकेकरिता निश्चित केली.हवालाचा पैसा फक्त इसिससाठीचगोरेगावच्या स्पोर्ट्स इंटरअ‍ॅक्टिव्ह या खासगी कंपनीत वेब डिझायनिंगचे काम करणाऱ्या मुदब्बीरला महिना ६५ हजार पगार होता. तीन वर्षांपूर्वीच इसिसच्या संपर्कात आल्याने त्याचे कामात दुर्लक्ष झाले. कामातील अनेक चुका आणि अनियमिततेमुळे त्याला डिसेंबर २०१२ मध्ये कामावरून काढण्यात आले. काम सोडताना आणि कामावर असताना त्याच्याकडे ३० लाख एवढी रक्कम जमा झाली होती. त्यातले सहा लाख रुपये त्याने बांद्रा येथील जुल्फीकार सय्यद पूनावाला या रिअल इस्टेटचे काम करणाऱ्या मामाकडे दिले होते. त्याने जमीन विक्रीमध्ये पैसे गुंतविल्याने त्याला १२ लाख रुपये परतही केले होते. दरम्यान, त्याला हवालामार्फत आठ लाखांची रोकड मिळाली होती. ही रक्कम मात्र तो केवळ इसिसच्या कामासाठीच खर्च करीत होता. त्यातूनच लखनौ आणि मुंबईतील जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा खर्च, लॅपटॉप खरेदी त्याने केला होता. याशिवाय, ‘इसिस’मध्ये जे भरती झाले, त्यांनाही यातूनच त्याने पैसेही वाटले. सुमारे तीन लाख रुपये लखनौमधील एकाला दिले होते, अशी माहितीही आता ‘एनआयए’च्या तपासात उघड झाली आहे.असे जाळे फेकायचा मुदब्बीर...फेसबुकवर ‘इसिस’च्या माध्यमातून एखादी ‘पोस्ट’ ‘अपलोड’ केल्यानंतर ती आधी ‘लाइक’ करायची. नंतर ती त्याच्या मित्रांमध्ये टाकायची. तिला ज्याने ‘लाइक’ केले, त्याच्याशी चॅटिंग करायचे. मग त्याला सीरियातील किंवा अन्यत्र मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची क्लिपिंग दाखवायची. त्यानंतर त्याला इसिसमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करायचे, असा त्याचा क्रम होता. वेगवेगळ्या देशांमध्ये मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे चित्रण असलेल्या सिडीजही त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. भरती होणाऱ्यांपुढे दोनच पर्यायइसिसमध्ये भरती होण्यासाठी जे तयार झाले, त्यांना मुदब्बीरकडून दोन पर्याय दिले जायचे. एक सीरियातील युद्धात सहभागी व्हा किंवा भारतातच राहून इसिसमध्ये काम करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करा.