शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

साध्वी प्रज्ञासिंहला एनआयएची क्लीन चिट

By admin | Published: May 14, 2016 3:21 AM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून

तुरुंगातून सुटकेचा मार्ग झाला सुकरमुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून, कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील मकोकातंर्गत आरोप हटवले आहेत. यामुळे प्रज्ञासिंह व पुरोहित यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रज्ञासिंहच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग सुकर झाला असून, पुरोहितही जामिनावर बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बॉम्बस्फोटातील प्रज्ञाचा सहभाग स्पष्ट करणारे ठोस पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएने मागच्या महिन्यात म्हटले होते. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २00८ मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहितचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरु वातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती. यापूर्वीच एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर व पुरोहित यांच्यावर लावण्यात आलेला मकोका हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते.केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.हा खटला चालवणाऱ्या सरकारी वकील अ‍ॅड. रोहिणी सालियन यांनीच तशी तक्रार केली होती. आपणावर दबाव येत असल्याची तक्रार करताना त्यांनी एनआयएचे अधीक्षक सुहास वारके यांचे नावही घेतले होते. त्यामुळे हे प्रकरण यापुढेही सौम्यपणे हाताळले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश एनआयएकडून आल्याचा आरोपही त्यांनी गेल्या वर्षी केला होता. काँग्रेसची टीकाआपल्या परिवारातील मंडळींना सोडून देण्यासाठी भाजपाने आणि मोदी सरकारने हे चालवले आहे. या पद्धतीने आरोपींबाबत सौम्य भूमिका घेण्याचा प्रकार अतिशय चुकीचा आहे.- दिग्विजयसिंह, काँग्रेस नेते >हेमंत करकरे यांच्या तपासावर शंकाएनआयएनच्या आधी तपासाचे काम महाराष्ट्र एटीएसकडे होते आणि हेमंत करकरे यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. पण नंतर तपास एनआयएकडे गेला. एनआयएने एटीएसच्या तपासाबद्दल शंका उपस्थित केली आहे. तसेच पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या मुंबई हल्ल्यात लढताना हुतात्मा झालेल्या स्व. करकरे यांच्याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. हा तपास हेमंत करकरे यांनी सुरू करून प्रज्ञासिंगसह अनेकांना अटक करताच, भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. टीका करणाऱ्यांमध्ये लालकृष्ण अडवाणी आणि शिवराजसिंग चौहान हेही होते. >साक्षी-पुराव्यांच्या मूल्यमापनानुसार प्रज्ञासिंहविरुद्ध खटला चालविण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. कारण साक्षीदाराने दिलेली साक्ष मागे घेतल्याने प्रज्ञाविरुद्ध कायदेशीर मुद्दाच राहत नाही, असे ‘एनआयए’ने म्हटले आहे.