शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
3
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
4
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
5
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
6
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
7
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
8
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
9
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
10
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
11
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
12
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
13
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
14
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
15
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
16
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
17
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
18
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
19
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
20
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!

चोख बंदोस्तात 'नीट- २' सुरळीत

By admin | Published: July 24, 2016 8:28 PM

नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 24 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नीट-२साठी आखून दिलेले कडक नियम व अटींमुळे रविवारी अनेक विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. औरंगाबादेतील १३ केंद्रांवर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांनीच रविवारी ही परीक्षा दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा झाली. गेल्या वर्षी हीच परीक्षा प्री मेडिकल एंट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षाच रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल एंट्रन्स इलिजीबिलीटी टेस्ट अर्थात नीट-२ ही परीक्षा आज २४ जुलै रोजी औरंगाबादेतील १३ केंद्रांवर घेण्यात आली. मराठवाडा, खान्देश, विदर्भाचे काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील ५ हजार ९०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दिल्ली येथून सीबीएसईह्णचे २८ अधिकारी रविवारी औरंगाबादेत तळ ठोकून होते. यातील ८ अधिकाऱ्यांच्या पथकांनी सर्व केंद्रांना सतत भेटी दिल्या. परीक्षा केंद्रांवर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्यक्षात सकाळी ९.३० वाजेपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे किमान १ तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. मात्र, बहुतांशी परीक्षा केंद्रे ही शहराबाहेर ह्यसीबीएसई शाळांमध्ये असल्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यास १०-१५ मिनिटे उशीर झाला. त्यामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यात आले नाही. दुरून आल्यानंतरही परीक्षेपासून मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विनंती केल्यानंतरही त्यांना केंद्रांमध्ये प्रवेश मिळू शकला नाही.सीबीएसईचे जाचक निर्बंधसर्व केंद्रांच्या मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरमार्फत विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यात आला. केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल, कॅलक्युलेटर, टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे, पेन-पेन्सिल नेण्यास मनाई होती. केंद्रामध्येच विद्यार्थ्यांना पेन-पेन्सिल देण्यात आली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गणवेश संहिताही लागू करण्यात आलेली होती. माळीवाडा येथील जैन इंटरनॅशनल स्कूलने या परीक्षेत समन्वयकाची भूमिका बजावली. भौतिकशास्त्राचा पेपर कठीण गेल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.