मुंबई : शिवसेनेच्या नाइट लाइफच्या प्रस्तावाला सुरुंग लावणाऱ्या भाजपाने हाँगकाँग आणि सिंगापूरच्या धर्तीवर रात्र बाजारपेठ सुरु करण्याचा प्रस्ताव मात्र मंजूर करुन घेतला आहे़ फेरीवाला धोरणांतर्गत संपूर्ण मुंबईत अशा रात्र बाजारपेठ सुरु करण्याच्या प्रस्तावाला विधी समितीने हिरवा कंदील दाखविला आहे़ मित्रपक्षाच्या या खेळीमुळे शिवसेनेच्या गोटात मात्र प्रचंड असंतोष पसरला आहे़सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आलेले नाइट लाइफचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी प्रचंड धडपड केली़ परंतु पोलिस विभागाच्या मंजुरीनंतरही राज्यातील भाजप सरकारने अद्याप हा प्रस्ताव रेंगाळत ठेवला आहे़ तसेच गच्चीवर टेरेस रेस्टॉरेंटचा प्रस्तावही भाजपाने विरोधी पक्षांच्या मदतीने सुधार समितीमध्ये लटकवला़ यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये वाद रंगला होता़ यात मरीन ड्राईव्हवरील एलईडी पथदिव्यांनी भर घातली असताना भाजपाच्या मागणीनुसार सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर रात्र बाजारपेठ सुरु करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला़ फेरिवाला धोरणांतर्गत मुंबईतील काही मोजक्या ठिकाणी अशा रात्र बाजारपेठेचा प्रयोग करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव भाजपाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विधी समितीने आज मंजूर करीत शिवसेनेला शह दिला आहे़ (प्रतिनिधी)
नाइट लाइफ लटकले, रात्र बाजारपेठेला मंजुरी
By admin | Published: July 09, 2015 2:02 AM