शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नऊ मार्गांवर आजपासून रातराणी

By admin | Published: January 02, 2017 2:27 AM

रात्रीच्या वेळी खासगी वाहनांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) रात्र बससेवेचे पाच मार्ग वाढविण्यात आले आहेत.

पुणे : रात्रीच्या वेळी खासगी वाहनांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) रात्र बससेवेचे पाच मार्ग वाढविण्यात आले आहेत. हे मार्ग सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार असल्याने शहरात रातराणीचे एकूण नऊ मार्ग झाले आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून रात्रीच्या वेळी शहरात येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.शहरात स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर या भागांत रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या भागात काही रिक्षाचालक व इतर खासगी वाहनचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतात. प्रवाशांची ही एक प्रकारे लूटच केली जाते. मात्र, इतर पर्याय नसल्याने प्रवाशांकडून पैसे दिले जातात. या पार्श्वभूमीवर पीएमपीने रातराणीचे मार्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शिवाजीनगर ते कात्रज, पुणे स्टेशन ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर आणि पुणे स्टेशन ते हडपसर या मार्गांवर ही बससेवा सुरू होती. आता सोमवारपासून स्वारगेट ते निगडी, पुणे स्टेशन ते निगडी, पुणे स्टेशन ते कोंढवा गेट, स्वारगेट ते धायरी आणि पुणे स्टेशन ते वाघोली हे पाच नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहोत. ही सेवा रविवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. या बससेवेचा तिकीटदर नियमित तिकीटदरापेक्षा केवळ पाच रुपये अधिक असेल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मार्ग व सुटण्याच्या वेळा१) शिवाजीनगर ते कात्रज : शिवाजीनगरहून - ००.१०, ०१.२०, ०२.४५, ०४.२०, ०५.२०. कात्रजहून - २३.३०, ००.४५, ०२.१५, ०३.४५, ०४.५०.२) पुणे स्टेशन ते कात्रज : पुणे स्टेशनहून - २३.५०, ०१.२०, ०२.४०, ०४.१० (स्वारगेटपर्यंत), ०५.०५. कात्रजहून - २३.००, ००.३०, ०२.००, ०३.२०, ०४.३५ (स्वारगेटपासून). ३) स्वारगेट ते हडपसर : स्वारगेटहून - २१.४०, २३.००, २४.२०, ०१.४०, ०४.३०. हडपसरहून - २१.००, २२.२०, २३.४०, ०१.००, ०३.५५.४) पुणे स्टेशन ते हडपसर : पुणे स्टेशनहून - २३.४०, ०१.१०, ०२.२०, ०४.००, ०५.१०.५) स्वारगेट ते निगडी (वाकडेवाडीमार्गे) : स्वारगेटहून - २३.४५, ००.४५, ०१.४५, ०२.४५, ०४.००, ०५.००. निगडीहून - २३.४५, ००.४५, ०१.४५, ०२.४५, ०४.००, ०५.००.६) पुणे स्टेशन ते निगडी (औंधमार्गे) : पुणे स्टेशनहून - २३.०५, ००.१०, ०१.१५, ०२.२०, ०३.३०, ०४.३५. निगडीहून - २३.०५, ००.१०, ०१.१५, ०२.२०, ०३.३०, ०४.३५.७) पुणे स्टेशन ते कोंढवा गेट : पुणे स्टेशनहून - २३.००, ०१.३०, ०३.५५. कोंढवा गेटहून - ००.१५, ०२.४५, ०५.३५.८) स्वारगेट ते धायरी : स्वारगेटहून - ००.४५, ०२.१०, ०३.३०, ०५.००. धायरीहून - ०१.२५, ०२.५०, ०४.१०, ०५.४०.९) पुणे स्टेशन ते वाघोली : पुणे स्टेशनहून - २३.१५, २४.००, ००.४५, ०१.३०, ०२.४५, ०३.३०, ०४.१५, ०५.००. वाघोलीहून - २४.००, ००.४५, ०१.३०, ०२.१५, ०३.३०, ०४.१५, ०५.००,०५.४५.