निलंगा (जि. लातूर) : निलंगा नगराध्यक्षांच्या घरावर झालेल्या हल्लाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या शहर बंदला मंगळवारी हिसंक वळण लागले़ यामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ नगराध्यक्षा विद्या धानोरकर यांच्या घरावर रविवारी सायंकाळी ६़३० च्या सुमारास सुमारे ४० तरुणांनी हल्ला केला होता़ धानोरकर यांचे पती भास्कर व मुलगा तसेच कुटुंबातील महिलांना मारहाण करुन घरातील रोख २२ हजार रुपये, सोन्याची चेन हिसकावून नेली होती़ घरासमोरील मोटारसायकलची तोडफोड करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद नगराध्यक्षा विद्या धानोरकर यांनी निलंगा पोलिसात दिली होती़ त्यानुसार ४० जणांवर गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, इरफान पाटेवाले व चिंग्या सय्यद यास अटकही केली आहे़ मंगळवारी या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध पक्ष, संघटनांच्या वतीने निलंगा शहरात बंद पाळण्यात आला़ बंददरम्यान, जमावाने निलंगा आगाराच्या दोन बसच्या काचा फोडल्या़ (वार्ताहर)
निलंगा बंदला हिंसक वळण
By admin | Published: December 24, 2014 2:15 AM