शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

निलंगेकरांना आरोपी करण्याचा अर्ज फेटाळला

By admin | Published: April 15, 2016 2:23 AM

मुंबईत कुलाबा येथील लष्कराची जमीन आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटीस देण्यासंबंधीच्या कथित घोटाळ््यात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव देशमुख निलंगेकर यांनाही आरोपी करण्याचा

मुंबई : मुंबईत कुलाबा येथील लष्कराची जमीन आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटीस देण्यासंबंधीच्या कथित घोटाळ््यात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव देशमुख निलंगेकर यांनाही आरोपी करण्याचा आदेश केंद्रीय गुप्तचर संस्थेस (सीबीआय) द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केलेला हा अर्ज फेटाळताना न्या. साधना जाधव यांनी नमूद केले की, तपास यंत्रणेला अशा प्रकारचा आदेश फक्त न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठच देऊ शकते. एकल न्यायाधीशास असा आदेश देता येणार नाही. शिवाय, वाटेगावकर यांनी या आधी अशीच विनंती करणारे अर्ज द्विसदस्यीय खंडपीठापुढे दोन वेळा केले होते व दोन्ही वेळा अर्ज मागे घेतल्याने खंडपीठाने ते निकाली काढले होते.न्या. जाधव यांनी म्हटले की, ‘निलंगेकर यांना आरोपी करण्यासारखा कोणताही पुरावा तपासात समोर आलेला नाही, हिच सीबीआयची भूमिका पूर्वीप्रमाणे आताही कायम आहे. त्यामुळे एकाच प्रकारच्या विनंतीसाठी पक्षकाराने वारंवार अर्ज करीत राहणे, हा न्यायालयाच्या वेळेचा केवळ अपव्ययच नाही, तर तो न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोगही आहे.’आदर्श सोसायटीला जमीन देण्यासंबंधीच्या निर्णय प्रक्रियेत निलंगेकर महसूलमंत्री या नात्याने एका टप्प्यात सहभागी होते व त्याच्या बदल्यात त्यांचे जावई डॉ. अरुण ढवळे यांना फ्लॅट देण्यात आला, असा वाटेगावकर यांचा आरोप होता.यासाठी वाटेगावकर यांनी पहिला अर्ज २०१३ मध्ये केला व द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणीस आल्यावर तो मागे घेतला. नंतर त्यांनी तसाच अर्ज ‘आदर्श घोटाळा’ चालविणाऱ्या विशेष न्यायालयात केला. असा आदेश आपण देऊ शकत नाही, असे म्हणून विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळल्यावर वाटेगावकर यांनी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज केला व तोही द्विसदस्यीय खंडपीठापुढे मागे घेतला. आताचा अर्ज हा तिसरा होता. (विशेष प्रतिनिधी)जावयास मात्र केले आरोपीसरकारी निर्णय प्रक्रियेत अधिकारपदांवरील विविध व्यक्ती आपापली मते/सूचना नोंदवत असतात. त्यास गुन्हेगारी स्वरूपाने पाहता येणार नाही, असे म्हणून सीबीआयने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात निलंगेकरांना ‘क्लीन चिट’ दिली. मात्र, ‘आदर्श’ सोसयटीतील बेनामी फ्लॅट खरेदीच्या संदर्भात ४५ आरोपींवर जे पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे, त्यात कन्हैयालाल गिडवाणी व सुनील गिडवाणी यांच्या मे. जय महाराष्ट्र कन्झ्युमर प्रा. लि.च्या वतीने बेनामी खरेदीदार या नात्याने निलंगेकर यांचे जावई डॉ. अरुण ढवळे यांच्यासह संपत खिडसे यांना आरोपी केले गेले आहे, असे सीबीआयने नमूद केले.