मुंबई: राज्यात अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकार आणि भाजप आमनेसामने उभे ठाकल्याचे दिसत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांमध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती यांसारख्या विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला वाघावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगताना दिसत आहे. यातच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने उडी घेतली आहे. (nilesh rane criticises sanjay raut on chandrakant patil statement)
भाजप नेते आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाची चहा सुद्धा येते आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हंटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद
वाघाशी कधी मैत्री होत नाही फार
वाघाशी कधी मैत्री होत नाही फार. वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची. चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. त्यांना कुणाकुणाशी मैत्री करायची आहे, त्याची यादी त्यांनी पाठवून द्यावी, त्यावर आपण काम करू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
मेहुल चोक्सी घुसखोर! डॉमिनिका सरकारचा दणका; प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा?
तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय
मला एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगले आहे. आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटले आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.