मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस अधिकाधिक जटील होत आहे. एकीकडे या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई आणि बिहार पोलीस आमनेसामने आले आहेत. तर या प्रकरणावरून राजकारणही रंगले आहे. दरम्यान, भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.
निलेश राणे या प्रकरणी केलेल्या ट्विटमध्ये म्हणतात की, दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला जातात. त्यानंतर लगेच आज पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेतात. काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मूर्ख नाहीत. जसे दिवस जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहे. म्हणून रोज धडपड सुरू आहे, अशी शंका निलेश राणे यांनी उपस्थित केली आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आझ पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, ते म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला आत्महत्या केली. मात्र या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांतनं आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या घरात पार्टी झाल्याची चर्चा होती. मात्र तशी कोणतीही पार्टी झालेली नसल्याची माहिती परमबीर सिंह यांनी दिली. आम्ही या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र तसं काहीही हाती लागलं नसल्याचं परमबीर सिंह म्हणाले. मात्र या प्रकरणात काही घातपात झाला का, त्या अनुषंगानंदेखील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुशांतच्या वडिलांनी आत्महत्या प्रकरणात पाटण्यात तक्रार नोंदवली होता. त्यात त्यांनी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे बिहार पोलीस मुंबईत तपासासाठी आले आहेत. या प्रकरणात सध्या मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा संघर्ष होत असताना दिसत आहे. त्यावरही परमबीर सिंह यांनी भाष्य केलं. सुशांतचे वडील, त्याची बहिण, त्यांचे पती यांचा जबाब आम्ही १६ जूनला नोंदवला. मात्र त्यावेळी त्यांनी कोणताही संशय नोंदवला नाही. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी अनेकदा संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल