खानापूर शिवारातील घटना: जखमीत कर्नाटक, आंध्रातील व्यक्तींचा समावेश
सोलापूर: सोलापूरहून उमरग्याकडे निघालेली बस आणि मुंबईकडे निघालेला कंटेन या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले. राष्टÑीय महामार्गावरील खानापूर (ता. तुळजापूर) शिवारात ही आज (गुरूवारी) सकाळी ९.३० वाजता घटना ही घडली. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
एम. एच. ४० एन ९१९३ ही सोलापूरहून उमरग्याकडे निघाली होती. खानापूर शिवारात बस आल्यानंतर समोरुन येणाºया कंटेनरने (के. एच. ०१ एई ००८७) धडक दिली. यात बसमधील अख्तर मते (वय- ३२, सावंतवाडी, जि. गुलबर्गा), गणेश कोकाटे (वय- ३६. वाकाव, ता. माढा), तानाजी शिरसट (वय- ४९, सुर्वेनगर, मोहोळ), करुणा विटकर (वय- ४०, रा. अभिनवनगर, सोलापूर) अरुणा श्रगिरी (वय- २०), रुकुदा श्रीगिरी (वय- ४०, रोघे रा. महिबून नगर, आंध्रप्रदेश), सतीश विठ्ठल सूर्यवंशी, (वय- २६, रा. कवठा, ता. उस्मानाबाद), सुदाम सांगळी (वय- ४२, बुधवार पेठ, सोलापूर) यांचा समावेश आहे. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.