शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

डेप्युटी आरटीओच्या नऊ कार्यालयांचा दर्जा वाढणार; सुधारित आकृतिबंध; सहा. माेटार निरीक्षकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 12:47 PM

राज्यातील आरटीओ व डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमताेल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे.

नांदेड : विविध वाहनांचे पासिंग, ओव्हरलाेड वाहतूक राेखणे, महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावणे आदी प्रमुख जबाबदारी असलेल्या प्रादेशिक परिवहन खात्यात मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध सादर करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक फटका हा सहायक माेटार वाहन निरीक्षक व लिपिक टंकलेखकांना बसणार आहे. त्याचवेळी डेप्युटी आरटीओची नऊ कार्यालये अपग्रेड केली जाणार आहेत.  राज्यातील आरटीओ व डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमताेल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. परिवहन खात्याने या आकृतिबंधाला ग्रीन सिग्नल दिला असून, आता ताे मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे गेल्याचे सांगितले जाते.   परिवहन विभागात राज्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून एकूण ४ हजार २३५ पदे मंजूर आहेत; परंतु नव्या आकृतिबंधात ही संख्या तब्बल ३८२३ वर आणण्यात आली आहे. त्यात ४१२ ने घट झाली आहे. त्याचवेळी वाढलेली पदे व कमी झालेली पदे याची संख्या १ हजार ४० एवढी आहे. यात काही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची व लिपिकवर्गीय पदे वाढली, तर कनिष्ठ अधिकाऱ्यांची कमी झाल्याचे दिसून येते.  सर्वाधिक फटका हा लिपिक टंकलेखक-सहा. राेखपाल-कर अन्वेषक यांच्या ५२२ पदांना बसला आहे. त्या खालाेखाल सहायक माेटार वाहन निरीक्षकांची २०४ पदे नव्या आकृतिबंधात घटली आहेत. सहपरिवहन आयुक्तांची पाच, आरटीओची १२, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची तब्बल ७४ पदे वाढली आहेत.  

ही कार्यालये हाेणार अपग्रेडराज्यात १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. त्यात आता आणखी नऊची भर पडणार आहे. पिंपरी चिंचवड, जळगाव, साेलापूर, अहमदनगर, पालघर, चंद्रपूर, अकाेला, बाेरिवली व सातारा या डेप्युटी आरटीओ कार्यालयांचा दर्जा वाढवून ताे आता आरटीओचा करण्याचे प्रस्तावित आहे. 

अशी असेल रचना -सध्याची मंजूर पदे    प्रस्तावित पदे    कमी/वाढ परिवहन आयुक्त    ०१    ०१    ००अपर परिवहन आयुक्त    ०१    ०१    ००सहपरिवहन आयुक्त    ०१    ०६    ०५प्रादे. परिवहन अधिकारी    १६    २८    १२उपप्रादेशिक अधिकारी    ५६    ६०    ०४सहा. परिवहन अधिकारी    १००    १७४    ७४माेटार वाहन निरीक्षक    ८६७    ८६७    ००सहा. वाहन निरीक्षक    १३०२    १०९८    -२०४प्रशासकीय अधिकारी    १७    ६६    ४९कार्यालय अधीक्षक    ६६    १७९    ११३वरिष्ठ लिपिक    ३८३    ४४०    ५७टंकलेखक    १४२५    ९०३    -५२२एकूण    ४२३५    ३८२३    १०४०  

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस