विरार : पालघर जिल्ह्यात एकाच दिवशी वाहन अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृष्णा ढाब्यासमोर एका पादचाऱ्याला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख पटलेली नाही. महामार्गावर बाफना ओव्हरहेड पुलाच्या पुढे रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला समोरून आलेल्या भरधाव दुचाकी स्वाराने ठोकर दिल्याने चालक विक्रांत दिलीप काकडे (३०) हा जागीच ठार झाला. यावेळी दुचाकीच मागे बसलेली त्याची पत्नी मात्र थोडक्यात बचावली.मुंबईहून गुजरातला जात असताना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेढवण घाटात झालेल्या अपघातात गुजरात मधील नवसारी येथील नवीनभाई फकीरभाई राठोड याचा मृत्यू झाला. मेढवणजवळील वाडा खाद्कोना येथे ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने ललित मोहन श्यामसुंदर मिश्र (३२), रवींद्र अरुणकुमार पांडे (३३) (दोघे राहणार मुंबई) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला.तलासरी तालुक्यात घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाई बाजूकडून वेवजीकडे जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने देवकु ईश्वर कुऱ्हाडा (७२) हिचा जागीच मृत्यू झाला. मनोर वाडा रोडवर कॅनोन कंपनीसमोर डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या अमित मधुकर सवरा (२६) आणि नितीन सांबरे (२३) यांचा मृत्यू झाला. गोरेगाव येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार वृषभ माळी (२७) काल रात्री उशिरा कामावरून चहाडे येथील आपल्या घरी मोटार साकलवरून परतत होता. त्यावेळी नंडोरे ेयेथे एका अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने माळी यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
पालघरमध्ये अपघातांत एकाच दिवशी नऊ जण ठार
By admin | Published: August 24, 2016 5:37 AM