शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

नऊ महिन्याच्या बाळाच्या नशिबी कारागृह !

By admin | Published: January 01, 2015 12:35 AM

शिक्षा भोगणारी आजीच करते संगोपन; : आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुनत आजी भोगतेय शिक्षा.

नीलेश शहाकार/बुलडाणा : आईने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली.. वडील अपंग आणि आजोबा दृष्टीहीन, आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुनत आजी शिक्षा भोगतेय. अशा विपरीत परिस्थितीत कुठलाही गुन्हा नसताना या शिक्षेचा भागिदार होण्याची वेळ आलीय ती एका निरागस निष्पाप नऊ महिन्यांच्या चिमुरड्यावर ! संवेदनशील माणसाच्या हदयाला पाझर फोडणारे हे वास्तव आहे, बुलडाणा जिल्हा कारागृहातील. जिलतील चिखली तालुक्यातील कनकखुर्द येथील प्रमिला वसंत जाधवने मुलाच्या लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात सुनेचा हुंड्यासाठी छळ सुरु केला. या छळाला कंटाळून या बाळाचाही विचार न करता विवाहितेने आत्महत्या केली. तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला.न्यायालयाने सुनेचा छळ आणि हत्येस कारणातून ठरवून आजी प्रमिला जाधवसह कुटूंबातील चार सदस्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व १२ डिसेंबर २0१४ ला कारागृहात रवानगी केली. अपंग वडील व दृष्टीहीन आजोबा नऊ महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करण्यास असर्मथ असल्याने त्याला सांभाळण्याची जबाबदारी आजीवर आली. शेवटी तो निरागसही कुठलाही गुन्हा न करता आजीसोबत कारागृहात बंदिस्त आहे. . नऊ महिन्यांच्या बाळासाठी कपडे व खेळणी पुरविले जातात. शिवाय या चिमुकल्याशी सर्वांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. शेवटी कर्तव्यासमोर काही गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतात आणि नियम व कायद्याचे पालनही करावे लागत असल्याचे कारागृह पोलिस अधिक्षक आशिष गोसावी यांनी सांगीतले.