शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
5
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
6
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
7
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
8
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
11
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
12
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
13
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
14
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
15
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
16
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
17
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
18
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
19
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
20
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

नऊ वर्षांच्या लढाईचा करुण अंत !

By admin | Published: July 08, 2015 2:13 AM

२००६ साली मुंबईत झालेल्या भीषण रेल्वे बॉम्बस्फोटांत जखमी झालेल्या पराग सावंत यांची ९ वर्षे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.

७/११ बॉम्बस्फोटातील पीडित पराग यांचा मृत्यूमुंबई : २००६ साली मुंबईत झालेल्या भीषण रेल्वे बॉम्बस्फोटांत जखमी झालेल्या पराग सावंत यांची ९ वर्षे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. बुधवार, ८ जुलैला दुपारी १च्या सुमारास पराग यांच्या पार्थिवावर भार्इंदर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासादरम्यान ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात पराग यांच्या मेंदूला जबर मार बसला होता. १२ जुलै २००६ रोजी पराग यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्या मेंदूवर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन दिवसांनी त्यांच्या मेंदूवर अजून एक शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर सलग दोन वर्षे पराग कोमात होते. यानंतर आश्चर्यजनकरीत्या त्यांनी डोळे उघडले, हाक मारल्यावर मान वळवून प्रतिसाद देत होते. पण यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. ते अर्ध संवेदना जागृतावस्थेत (५ीॅी३ं३्र५ी २३ं३ी) स्थितीत होते. मंगळवार, ७ जुलैला पहाटे साडेपाच वाजता पराग यांची सामान्य तपासणी करण्यात आली, तेव्हा सर्व ठीक होते. यानंतर थोड्याच वेळात पराग यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे त्यांच्या आईला जाणवले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.