शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वृद्धाचा नऊ वर्षे संघर्ष

By admin | Published: July 18, 2016 2:10 AM

आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करूनही या तपासात प्रगती शून्यच असल्याचा आरोप कन्हय्या मोटवानी या ७८ वर्षीय वृद्धाने केला

मुंबई : अंधेरी येथील चकाला येथील पॉप्युलर कार बाजार परिसरातील आपला भूखंड बळकावल्याच्या आरोपावरून हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) तसेच अन्य आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करूनही या तपासात प्रगती शून्यच असल्याचा आरोप कन्हय्या मोटवानी या ७८ वर्षीय वृद्धाने केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत केवळ दोनच आरोपींना अटक करण्यात आली असून, एचडीआयएल कंपनीच्या संचालकांसह अन्य चार आरोपींविरुद्ध कोणतीच कारवाई झालेली नाही. चकाला परिसरातील २५,२७१ चौ.मीटर म्हणजेच सुमारे आठ एकरचा अविभक्त भूखंड अर्जुनदास ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा होता. कन्हय्या मोटवानी यांनी १९९४ साली ३.९५ कोटी रुपयांना या भूखंडाचे विकासहक्क खरेदी केले. या भूखंडाच्या संरक्षणासाठी मोटवानी यांनी त्याभोवती कंपाउंड बांधून आत एक कार्यालयासाठी बंगला विकत घेतला होता. त्यानंतर ठाकूर कुटुंबीयांनी या भूखंडाचा काही भाग परस्पर पॉप्युलर कार बाजारला विकला. त्यातून मोटवानी आणि ठाकूर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला. मोटवानी त्यावर उच्च न्यायालयात गेले. याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत तिसऱ्या पक्षाचा या भूखंडावर हक्क निर्माण होणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला. मात्र या आदेशानंतरही २00८ साली ठाकूर कुटुंबीयांनी हा भूखंड एचडीआयएल कंपनीला विकून आपली फसवणूक केल्याचा मोटवानी यांचा आरोप आहे.मोटवानी यांच्या तक्रारीवरून ५ डिसेंबर २0१३ रोजी कफ परेड पोलिसांनी एफआरआर दाखल केला. ठाकूर कुटुंबातील सहा जण आणि एचडीआयएल कंपनीचे संचालकांना यात आरोपी करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवण्यात आले. येथील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राजीव ठाकूर आणि आशिष ठाकूर या दोघांना अटक केली. मात्र पुढे तपास खुंटला आणि अन्य आरोपींवर कारवाई झालीच नाही. आजमितीस तपास पूर्णपणे थांबला आहे. आतापर्यंत पाच तपास अधिकारी बदलले. सहा महिन्यांपूर्वी याबाबत आपण सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) यांचीही भेट घेतली. त्यांनी सर्व आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याचे मोटवानी यांनी सांगितले. ‘ही जमीन १९९४ ते फेब्रुवारी २0११ या कालावधीपर्यंत माझ्या ताब्यात होती. ही जमीन विकता येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचा करार करता येणार नाही, अशी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली होती. विशेष म्हणजे एचडीआयएलनेही वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत त्यात या जमिनीच्या सर्व हक्कधारकांबाबत चौकशी करीत असल्याचे नमूद केले. ‘ही नोटीस वाचताच आमच्या वकिलांनी एचडीआयएलशी संपर्क साधत हा भूखंड आमच्या फर्मचा असल्याचे स्पष्ट केले. त्यावर ‘आम्ही तुमच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करू, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र पुढे काहीही झाले नाही’, असे मोटवानी यांनी सांगितले. या जमिनीचा विकास करारनामा झाला असल्याचे माहीत असताना एचडीआयएलचे संचालक वरायम सिंग यांनी २00८ मध्ये ठाकूर कुटुंबीयांशी करार करून माझे या जमिनीतील हक्क कायदेशीर मार्गाने संपादन करण्याची हमी घेतली होती. परंतु नंतर जबरदस्तीने कब्जा घेतल्याची मोटवानी यांची तक्रार आहे. >बनावट कागदपत्रांचा तपास व्हावाया प्रकरणात केवळ आपली फसवणूक झाली नसून, एचडीआयएल आणि ठाकूर कुटुंबीयांनी त्यांना कायदेशीर अधिकार नसताना या जमिनीचा दुसऱ्यांदा खरेदी व्यवहार केला आहे. या व्यवहारासाठी वापरलेली संबंधित कागदपत्रे बनावट असल्याने याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे असे म्हणत मोटवानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.