ऑनलाइन लोकमतनिफाड (नाशिक), दि. 27 - जिल्ह्यातील निफाड येथे आज राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी येथे 6.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर मालेगाव येथे 7.2 अंश सेल्सिअस अंश असे तापमान नोंदविले गेले आहे.निफाड तालुक्याला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. मंगळवारी सकाळी कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात 6.4 अंश सेल्सिअस इतक्या कमी तपमानाची नोंद झाली आहे. हे राज्यातील सर्वात कमी तापमान आहे. जिल्ह्यातील मालेगाव येथेही 7.2 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद घाली आहे. यावर्षी निफाड तालुक्यात भरपूर पाऊस झाला आहे. निफाड तालुक्यात यावर्षी 6.4 से. इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद 10 डिसेंबर रोजी झाली होती. त्यानंतर मात्र थंडीचे चढउतार चालूच होते. 17 दिवसांनी कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाड तालुका गारठून गेला होता. थंडीमुळे तालुक्यातील रस्त्यावर रहदारी कमी होती. सर्वत्र शेकोट्या पेटवल्या होत्या. ही थंडी गहू, कांदा पिकांना पोषक ठरत आहे. मात्र द्राक्ष पिकांना थंडी हानिकारक असल्याने द्राक्ष उत्पादकात चिंतेचे वातावरण आहे. निफाडला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. त्यामुळे यावर्षी पारा किती खाली येतो याकडे निफाडकरांचे लक्ष लागून आहे.
निफाडला राज्यातील सर्वात कमी तापमान
By admin | Published: December 27, 2016 9:25 PM