सुनील राऊत - पुणो
पुण्याचा वैभवशाली गणोशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी पुणो महापालिकेकडून 14 वर्षापासून राबविली जात असलेली निर्माल्य संकलन मोहीम नदीप्रदूषण रोखण्यासाठी आदर्शवत ठरत आहे. मोहिमेच्या पहिल्या वर्षी 2क्क्1मध्ये अवघे 15 टन निर्माल्य संकलित झाले होते. त्यानंतर प्रशासनाने हे संकलन वाढविण्यासाठी राबविलेल्या उपाययोजना आणि या मोहिमेत महापालिकेच्या खांद्याला खांदा देत उभे राहिलेले नागरिक, तसेच स्वयंसेवी संस्थांमुळे यंदाच्या वर्षी तब्बल 4क्क् टन निर्माल्य महापालिकेने संकलित केले.
पुण्यातील गणोशोत्सव जगप्रसिद्ध असल्याने या उत्सवात जगभरातील भाविक पुण्यात हजेरी लावतात. तसेच, दर वर्षी या उत्सवात सहभागी होणा:या मंडळांची, तसेच घरगुती उत्सवाची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या काळात बाप्पांना वाहिलेल्या दूर्वा, हार, फुले, नारळ, बेलपत्र, कागदी आभूषणो, तसेच फळांचे 1क् दिवसांचे निर्माल्य मोठय़ा प्रमाणात निघते. हे निर्माल्य नागरिकांकडून गणोशमूर्तीचे विसजर्न करताना थेट नदीत टाकले जाते. परिणामी, नदीप्रदूषण तर होतेच, तसेच याच नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने निर्माल्याचे पावित्र्यही धोक्यात येते.
दहा वर्षापूर्वी शहरातील मुळा-मुठा नदीची अवस्था अगदी बिकट बनली होती. महापालिकेकडून शहरात निर्माण होणारे सर्व सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने या निर्माल्याचे पावित्र्य जपले जात नव्हते. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून शहरात ‘स्वच्छ’ या संस्थेच्या मदतीने 2क्क्1मध्ये विसजर्न घाटांवरच नागरिकांना आवाहन करून निर्माल्य त्या ठिकाणी ठेवलेल्या कलशांमध्ये ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली. मात्र, त्यास काही संस्थांकडून विरोध झाला. त्या वर्षी महापालिकेस थोडय़ा प्रमाणात निर्माल्य संकलित करण्यात यश आले. त्यानंतरही न डगमगता महापालिकेकडून या उपक्रमात आणखी सुधारणा करण्यात आली. त्यामुळे 2क्क्5मध्ये हे संकलन सुमारे 5क् ते 6क् टनांच्या घरात पोहोचले तर 2क्क्9-1क्मध्ये हे संकलन सुमारे 15क् टनांर्पयत पोहोचले.
पुणोकरांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील वर्षीपासून गणोश मंडळाच्या निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेद्वारे काही मंडळांसाठी हा उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात आला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील वर्षी सर्व शहरासाठी हा उपक्रम राबविण्यात येईल.
महापालिकेकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आल्यानंतर त्याचे वर्गीकरण केले जाते. निर्माल्य महापालिकेच्या शहरातील विविध गांडूळखत प्रकल्प, तसेच ओला कचरा प्रक्रिया करणा:या प्रकल्पांमध्ये पाठवून त्याचे खत तयार केले जाते. वेगळी केलेली फुले ही येरवडा कारागृहातील कैदी अथवा स्वयंसेवी संस्थांना दिली जातात. त्या फुलांचे नैसर्गिक रंग केले जातात.