मुंबई : भाजपाने नकार दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. त्यामुळे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठींब्याचा पत्र न मिळाल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे. तर यावरूनच नितेश राणे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. 'हीच ती वेळ'; असे म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेला टोला लागवाला आहे.
सत्तास्थापनेसंदर्भात राज्यपालांनी शिवसेनेला सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजताची वेळ दिली होती. त्यानुसार शिवसेनेने राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, आवश्यक संख्याबळाचं आणि पाठिंब्याचं पत्र ते सादर करु शकले नाही. त्यानंतर शिवसेनेने पाठिंब्याचं पत्र सादर करण्यासाठी 3 दिवसांचा अधिक वेळ मागितला होता.
मात्र राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला .त्यामुळे शिवसेनेची अडचण झाली. त्यात राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे सत्तेत बसायचे असेल तर शिवसेनेला आता राष्ट्रवादीला पाठींबा द्यावा लागणार आहे. त्यामुळे या मुद्यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. 'हीच ती वेळ' असे ट्वीट करत त्यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.