शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

Nitesh Rane: "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…", नितेश राणेंचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 11:26 AM

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विटमधून राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे.

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यातील सभेत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पाठोपाठ झालेल्या ठाणे आणि औरंगाबाद सभेतही राज ठाकरे यांनी हाच मुद्दा लावून धरत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला 3 मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले असताना भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या वादात उडी घेतली आहे. राणेंनी केलेल्या ट्विटची सध्या चर्चा सुरू झाली आहे. 

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतची मुदत दिली होती. यानंतरही कारवाई झाली नाही, तर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, आज राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीमध्ये भोंग्याशिवाय अजान देण्यात आली. यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी तीन ट्वीट केले असून त्यामधून भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच राज्य सरकारवर देखील निशाणा साधताना रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?आपल्या ट्विटमध्ये नितेश राणेंनी रझा अकादमी आणि पीएफआयला लक्ष्य केलं आहे. "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही. खरी समस्या समाजात विष कालवणाऱ्या रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्याविरोधात एकत्रपणे लढा देणे हीच काळाची गरज आहे. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे. तेव्हाच शांतता प्रस्थापित होईल", असं ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

राज्य सरकारवर निशाणाते पुढे म्हणतात, "रझा अकादमी ही एक दहशतवादी संघटना असून तिची कोणत्याही धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद झालेली नाही. अर्थात त्यांच्याकडे कोणताही नोंदणी क्रमांक नाही. तरीदेखील राज्य सरकार त्यांना आंदोलन करण्याची आणि काम करण्याची परवानगी देते. त्यांना कुठून निधी मिळतो हे आपल्याला कसं कळणार? त्यांचे सर्व कामकाज ताबडतोब बंद व्हायला हवं." 

ते पुढे म्हणतात, "एक सच्चा मुसलमान कधीही त्याच्या देशाविरुद्ध किंवा राज्याविरुद्ध जाणार नाही. मुस्लीम समाज हिंदू किंवा इतर कोणत्याही समाजासारखंच आपल्या मायभूमीवर प्रेम करतात. पण रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनाच द्वेष आणि भेदभाव पसरवततात. अमरावती, नांदेडमधील दंगली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांना संपवण्याची वेळ आली आहे", असंही नितेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे