शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Nitesh Rane : "आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय", नितेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 11:37 AM

Nitesh Rane : बाळासाहेब ठाकरेंनी ९३ च्या दंगलीत हिंदूंना वाचवले. आता उद्धव ठाकरे हे ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केला आहे.

मुंबई : राज्यात आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

बाळासाहेब ठाकरेंनी ९३ च्या दंगलीत हिंदूंना वाचवले. आता उद्धव ठाकरे हे ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. यात " ९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं... आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय...खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर  गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो...", असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर आज सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत सांगितले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले. तसेच, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास देवेंद्र फडणवीस भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी २००८ मध्ये नोकरीवर येतो आणि १४ वर्षांत मुंबईबाहेर जात नाही, यामागील  कारण काय..? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. 

नवाब मलिकांचे अंडर्वल्डशी संबंध, देवेंद्र फडणवीसांचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांशी संबंध असल्याचा घणाघात केला. नवाब मलिक यांच्या मुलाचे थेट संबंध दाऊद इब्राहिमसोबत असल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिक