शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

Nitesh Rane : नुपूर शर्मा यांच्या निमित्ताने हिंदूंवर वारंवार हल्ले होत असतील तर...; नितेश राणेंचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 2:24 PM

नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्यानिमित्ताने, अशा पद्धतीचे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजाल जात असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही, असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे पहिली घटना उदयपूरमध्ये घडली. नंतर अमरावतीत घडली. आज आमरावतीचा कोल्हेंचा तपास एनआयए करत आहे. जेव्हा नुपूर शर्मा यांची घटना घडली, तेव्हापासून भाजप म्हणून, आम्ही या कुठल्याही विषयाचे समर्थन करत नाही, हे सांगून हा विषय संपवला. पण त्यानंतर, अमरावतीत ज्यापद्धतीने कोल्हेंची हत्या करण्यात आली आणि नंतर 4 ऑगस्टला असाच प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडला. येथे प्रतीक पवार नावाच्या एका युवकावर १० ते १५ मुस्लीम युवकांनी हल्ला केला. आज तो मृत्यूशी झुंज देत आहे. नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्यानिमित्ताने, अशा पद्धतीचे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजाल जात असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही, असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील  कर्जत तालुक्यात प्रतीक पवार नावाच्या एका युवकाला तो अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीकडे जात असताना, १० ते १५ मुस्लीम युवकांनी त्याला थांबवले आणि तू नुपूर शर्माचा डीपी ठेवतोय, गावाच्या इतर लोकांनाही ठेवायला सांगतोय. हिंदू-हिंदू म्हणू फार आवाज करतोय. असे म्हणत, या १०-१५ लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात हत्यारं होती, कोयते होते. त्या एका युवकाला हल्ला करून त्यांनी खाली पाडले. तो युवक बेशुद्ध पडला. त्यांना वाटले तो युवक मेलाय आणि मग ते लोक तेथून निघून गेले. 

यानंतर, त्याच्या आजू-बाजूचा मित्रपरिवार तेथे आला आणि त्यांनी प्रतीकला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तेथे योग्य उपचार होऊ शकला नाही, म्हणून त्याला आज पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला ३५ टाके पडले आहेत. त्याच्या बरगड्यांमध्ये प्रचंड मार लागला आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले. 

तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही -याच वेळी, माझा मुद्दा एवढाच आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा हा देश आहे. नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्यानिमित्ताने अशा पद्धतीचे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजाल जात असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही. हा संदेश आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्हाला द्यायचा आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. याप्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला आहे, असेही राणे यांनी सांगितले. 

संबंधित पोलीस अधिकारी हिंदूंच्याच घरी जाऊन केस दाबण्याचा प्रयत्न करत होते - यावेळी, तेथील संबंधित पोलीस अधिकारी (पीआय) या हिंदूंच्याच घरी जाऊन केस दाबण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर, सर्व हिंदू संघटना एकत्र आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांसोबत बोलल्या आणि नंतर संबंधितांविरोधात कडक पद्धतीने एफआयआर नोंदवण्यात आला, असेही  राणे यांनी म्हणटे आहे. एवढेच नाही, तर आजही काही मुख्य आरोपी फरार आहेत. त्यांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी करत, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष आहे. ते आयजीसोबत बोलले आहेत. एसपीही संपर्कात आहेत. त्यामुळे संबंधितांना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

हे काही महाविकास आघाडीचे सरकार नाही -आता हे काही महाविकास आघाडीचे सरकार नाही. आता नवाब मलिक अल्पसंख्याकमंत्री नाही. आता तुम्ही कुठल्याही हिंदूंना टार्गेट केलं तर जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते, असा स्पष्ट संदेश मी या पत्रकार परिषदेतून देत आहे. आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. आमच्या देशात शरिया कायदा लागू नाही. तुम्ही तुमच्या देवतांवर कुणी काही बोलल्यानंतर, विसरायला तयार नसाल तर, त्या बाजूने आमच्या हिंदू देवी देवतांची विटंबना होणारी प्रकरणे राज्यात घडतात. मग जर तुम्ही विसरायला तयार नसाल, तर आम्ही का गप्प बसायचं? आम्ही का विसरायचं? असे सवाल करत, आमच्या लोकांना मारण्यापर्यंत तुमची हिंमत जात असेल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी तिसरा डोळा उघडावा लागेल. त्यामुळे आमच्या लोकांना कुणीही हात लावायची हिंमत करू नये. असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला. तसेच, प्रतिक पवार नावाच्या युवकाबरोबर आम्ही  ताकदीने उभे आहोत, असेही ते म्हणाले.

माझे सहकारी आमदार गोपिचंदजी पडळकर लवकरच संबंधित कुटुंबाची भेट घेणार आहेत. मीही त्या कुटुंबाची भेट घेणार आहे. या पूर्ण घटनेची चौकश अमरावतीच्या घटनेप्रमाणेच एनआयएने करावी, अशी मागणीही आम्ही करणार आहोत, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस