शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

नितेश राणेंची आमदारकी रद्द करा - मेधा कुलकर्णी

By admin | Published: January 19, 2017 3:23 PM

काँग्रेस नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 19 - काँग्रेस नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे  यांच्याकडे केली आहे. संभाजी उद्यानातील पुतळा हटवल्याप्रकरणी मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे. 
 
आमदार नितेश राणे यांनी त्यासंदर्भात जाहीर विधान करून पुतळा हटवल्याप्रकरणी पाच लाख रुपयांचा धनादेशही दिला आहे. लोकप्रतिनिधींनी अशी फूस लावणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे नितेश राणेंची आमदारकी रद्द करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी  मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
 
(भाजपा नेते राजन तेली यांच्या मुलावर हल्ला)
 
नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता. त्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. यात नितेश राणेंचा हात असल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यातच पुतळा हटवणाऱ्यांना पाच लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे सांगत बक्षिसाचा धनादेशही देत असल्याचे राणे यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते. राणेंच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे.
 
दरम्यान, कोथरूड नाट्य परिषद व रमाबाई आंबेडकर संस्था यांच्यातर्फे येत्या 23 जानेवारीला नाटककार राम गणेश गडकरी यांच्या 97 व्या स्मृति दिनानिमित्ताने गडकरी दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संभाजी उद्यानात करण्यात आले आहे. पोलिसांची कार्यक्रमाला परवानगी मिळाली असून महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे वेळ पडल्यास उद्यानाबाहेर कार्यक्रम करू, असे आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.