शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

NITI Aayog Meeting: एकनाथ शिंदे मोठे नेते, त्यांना शेवटच्या रांगेत स्थान...; PHOTO शेअर करत रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 8:42 PM

या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. आता, याच बैठकीदरम्यानचा एक फोटो राष्ट्रपवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला असून, एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे योग्य नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला होता. ही बैठक सकाळपासून ते सायंकाळपर्यंत चालली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी 2047 साठी भारताचे लक्ष्य काय असावे, यासह अनेक विषयांवर भाष्य केले. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. आता, याच बैठकीदरम्यानचा एक फोटो राष्ट्रपवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला असून, एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे योग्य नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार"एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!" असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

2047 वर फोकस -या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शहरी प्रशासन, कोविड नंतरची परिस्थिती आणि 2047 चे लक्ष्य, या विषयांवरही चर्चा झाली. याशिवाय डाळींचे उत्पादन आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या G-20 बैठकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. NITI आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, कोविड संकटाच्या काळात भारताची संघराज्य रचना आणि सहकारी संघराज्य संपूर्ण जगासाठी एक मॉडेल म्हणून उदयास आले आहे. 

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNIti Ayogनिती आयोग