सातारा : ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावणार आहे,’ असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी चळवळ उभी केली आहे. या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने गडकरी यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, तर माझ्यासाठी अभिमानाचा विषय ठरेल. सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्या असतील तर पंतप्रधानांकडे आग्रह धरून त्यांचा होकार घेईन,’असे आश्वासन गडकरींनी दिले.
‘मराठी’ ला अभिजात दर्जासाठी ताकद पणाला लावणार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:31 AM