काँग्रेस, राष्ट्रवादीने थकवल्यामुळे मुख्यमंत्री सुट्टीवर; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 04:16 PM2020-02-02T16:16:23+5:302020-02-02T16:18:09+5:30
राज्यातील सरकार हे शिवसनेनचं नाहीच, कारण त्यांचे मंत्री कॅबिनेटमध्ये कारकून सारखे वागतात.
मुंबई : मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची प्रशासकीय धावपळ सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. बैठका, उद्धाटन अशा कार्यक्रमातून वेळ काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसाच्या महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री महाबळेश्वर मुक्कामी असून राजभवन या शासकीय निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या ३ दिवसांच्या सुट्टीवरून भाजपचे नेते नीतेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने थकवल्याने उद्धव ठाकरे यांना सुट्टीवर जाण्याची वेळ आली आहे.त्यामुळेच ते तीन दिवस सुट्टीवर गेले आहेत. अशाप्रकारची थेट टीका नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण त्यांनी कधी सुट्टी घेतली, की नागपूरला सुट्टीवर गेले असं ऐकलं का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या सहा वर्षांपासून सेवा करत आहेत. मात्र ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले असं ऐकलं का? पण हे मुख्यमंत्री 60 दिवसातच थकले असल्याचं नितेश राणे म्हणाले.
राज्यातील सरकार हे शिवसनेनचं नाहीच, कारण त्यांचे मंत्री कॅबिनेटमध्ये कारकून सारखे वागतात. सर्व निणर्य फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीच घेतात असा टोलाही नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.