शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

मनपा निवडणूक : पनवेलमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

By admin | Published: May 26, 2017 7:33 AM

अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या महापालिकांवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 26 - पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. 20 प्रभागामधील 78 पैकी 51 जागांवर आघाडी घेतली आहे. प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी फक्त 25 जागांवर  आघाडीवर आहे. 
 
महापालिकेची पहिलीच निवडणुक असल्याने सर्वच राजकिय पक्षांनी पनवेलवर लक्ष केंद्रीत केले होते. भविष्यात या परिसरात येणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना विकास क्षेत्र व सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे देशातील मुंबईनंतरचे प्रमुख शहर म्हणून पनवेलची ओळख निर्माण होत आहे. सिडको व खाजगी विकासकांच्या माध्यमातून पाच वर्षात 60 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरात होत असल्याचे महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 
 
मतमोजणीच्या पहिल्या दोन तासामध्येच भाजपाने जोरदार मुसंडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आरपीआयला सोबत घेवून सर्व 78 जागा लढविणा-या भाजपाने 51 जागांवर आघाडी घेतली आहे. रायगडमधील सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला मतदारांनी नाकारल्याचे प्राथमीक चित्र दिसत आहे. शेकाप आघाडी 25 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदेश बांदेकर, एकनाथ शिंदे व डझनभर सेना नेत्यांनी प्रचार करूनही शिवसेनेला अद्याप समाधानकारक यश आलेले नाही. फक्त एक जागेवर यश मिळाले आहे. 
 
LIVE UPDATES 
 
पनवेल महापालिका 
एकूण जागा 78
भाजपा - 51
शेकाप, काँग्रेस,  राष्ट्रवादी काँग्रेस - 25
शिवसेना- 0
इतर0
 
 
कळंबोली प्रभाग क्रमांक ७ - भाजपाचा 4 जागांवर विजय 
१) अमर पाटील 
२) विद्या गायकवाड 
३) प्रमिला पाटील 
४) राजेंद्रकुमार शमा
 
प्रभाग क्रमांक 4 -  भाजपाचे सर्व उमेदवार विजयी
(मनपा निवडणूक : मालेगावात NCP 7 जागांवर विजयी, शिवसेनेची आगेकूच)
 
पक्षीय बलाबल
महाआघाडी : शेकाप 48, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 12 
भाजपा - 78
शिवसेना -65
स्वाभिमानी शेतकरी संघटना- 13
 
भिवंडी महापालिका - 
भिवंडीतील २३ प्रभागातील ९० जागांसाठी बुधवारी ५१ टक्के मतदान झाले. मागील वेळेपेक्षा साधारण पाच टक्के अधिक मतदान झाल्याने प्रत्येक पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत. मतमोजणीसाठी २६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
 
पनवेल महापालिका - 
पनवेल महापालिकासाठी ५५ टक्के मतदान झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ७८० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
 
 
 
 
 
प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपाचे विजयी उमेदवार