मुंबई : एसव्हीकेएमच्या नरसी मोनजी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस) संस्थेने पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवसाय व्यवस्थापन, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, फायनान्स आणि मॅनेजमेंट या विषयांमधील हे अभ्यासक्रम आहेत. ‘एनएमआयएमएस प्रोग्रॅम आफ्टर टष्ट्वेल्थ २०१६’ (एनपीएटी २०१६) ही परीक्षा १४ आणि १५ मे रोजी पार पडणार आहे.रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असे हे कोर्सेस असल्याची माहिती संस्थेने दिली. या प्रवेश पूर्व परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना बी.टेक, एमबीए(टेक), एमबीए (फार्मा टेक), बीबीए, बीकॉम (आॅनर्स), बीएससी (फायनान्स), बीबीए-एमएमएस आणि बीएससी इकॉनॉमिक्स या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतील. त्यातील मुंबई कॅम्पसमध्ये सर्व कोर्सेस शिकवण्याची सुविधा आहे, तर धुळ््यातील शिरपूर येथे अभियांत्रिकी आणि फार्मसी रेसिडेंशिअल प्रोग्रॅम उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)
एनएमआयएमएसची प्रवेश पूर्व परीक्षा १४ आणि १५ मे रोजी
By admin | Published: May 04, 2016 2:31 AM