लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुनर्वसित माळीण प्रकल्पातील घरांना पहिल्याच पावसात तडे गेले, रस्त्यांना भेगा पडल्या,चेंबर व मातीचे भराव खचले,मात्र, जिल्हा प्रशासनाने संबंधित कंत्राटदार किंवा प्रकल्प सल्लागारांना यात दोषी धरले नाही.या उलट प्रशासनाकडून कंत्राटदाराची पाठराखण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.परंतु,पावसामुळे निर्माण झालेल्या या स्थितीनंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे.पुनर्वसित माळीण प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी पावसाळा संपेपर्यंत विशेष निरीक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे.तसेच सचिव दर्जाच्या एका वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांमार्फत कामाची पाहणी करून त्यावरील उपाययोजनेचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. परंतु, संबंधित अहवाल अद्याप प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही.पावसाळ्या जास्त असल्याने ही घटना घडली असण्याची शक्यता जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मात्र,त्यास कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार किंवा प्रकल्प सल्लागारांना सधी नोटीसही दिलेली नाही.परंतु, दोन वर्षाच्या करारानुसार कंत्राटदाराकडून दुरुस्तीची कामे करून घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आले.घरे भूकंपरोधक आहेत. जमिनीखाली सुमारे दीड ते दोन मीटर खोल खड्डे खोदून मातीत घरांचे वजन पेलण्याची क्षमता आहे का? हे तपासण्यात आले. त्यानंतर हा प्रकल्प उभारण्यात आला.परंतु, त्यामुळे बांधकामांना कोणताही धोका निर्माण झालेला नाही.घरांच्या बांधकामांना धोका नसला, तरी घरांभोवती करण्यात आलेली इतर कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे आढळून आले आहे. पाऊस जास्त झाल्यास काय परिणाम होतील, याचा अंदाज कंत्राटदारांस न आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे या स्थितीला कोणालाही जबाबदार धरले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कंत्राटदारावर कारवाई नाही
By admin | Published: July 11, 2017 12:57 AM