शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

Maharashtra Rain: फक्त लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना मदतीचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 3:45 PM

Cm Uddhav Thackeray visit flood affected are: ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले, त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल.

ठळक मुद्दे दोन दिवसात अहवाल येणार आहे, अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल.

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने हाहा:कार माजवला आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील विशेष करुन महाड  आणि चिपळूणला पवसाचा मोठा फटका बसलाय. चिपळूणमध्ये तर पूरामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. दरम्यान, आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पुरामुळे ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळस त्यांच्यासोबत आमदार भास्करराव जाधव, मंत्री अनिल परब आणि अन्य नेते उपस्थित होते. 

चिपळूनमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन मदतीचे आश्वासन दिले. आपण हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागला आहे. काल मी तळीये गावात गेलो होतो. तिथे वर्षानुवर्षे असलेल्या गावांवर दरडी कोसळत आहेत. क्षणार्धात या दरडीखाली लोक दबून जात आहे. अचानक कुठेतरी ढगफुटी होते, पूर येतो, जीवितहानी होते. पिकांचही नुकसान होतं. हे आता दरवर्षी होत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, ‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेतील व्यावसायिक व दुकानदारांना धीर दिला.

लवकरच मदत मिळणारमुख्यमंत्री पुढे म्हणाले, माझ्याकडे दोन-चार दिवसात अहवाल येणार आहे. राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. अहवाल आल्यावर सर्वकष मदत केली जाईल. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, असे ते म्हणाले.

केंद्राकडून काय मदत मिळेल ते पाहू

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तशा सूचना दिलेल्या आहेत. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचनादेखील मी प्रशासनाला केल्या आहेत. यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत. आर्थिक मदत सुद्धा करू, एक आढावा येऊ द्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचा एकत्रिच आढावा घेऊन तात्काळ मदत घोषित करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसkonkanकोकणfloodपूरRaigadरायगडChiplunचिपळुणUddhav Thackerayउद्धव ठाकरे