पुणे : भाजपच्या कुठल्याही नेत्याने आदित्य ठाकरे यांचे नाव सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी घेतलेले नाही. असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र आता या प्रकरणात रोज नव्याने जे काही खुलासे समोर येत आहेत ते आश्चर्यकारक आहे. तसेच सीबीआय येईपर्यंत हे खुलासे का झाले नाही, ही आत्महत्याच का दाखवली गेली. मुंबई पोलिसांवर कोणता राजकीय दबाव होता का. आदी प्रश्न यावेळी उपस्थित केले. बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.
आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण
फडणवीस म्हणाले, सीबीआय या प्रकरणातील सत्य बाहेर काढील. पण हे आधी घडले असते, तर या प्रकरणातील पुरावे नाहीसे झाले नसते असे ही ते म्हणाले. या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांच्यावर आधारित चित्रपटाचे निर्माते याचेही नाव चर्चेत आहेत. असा प्रश्न उपस्थित केला असता फडणवीस यांनी, ते चर्चेत होते तर त्यांना मुंबई पोलिसांनी यापूर्वीच चौकशीला का बोलावले नाही, त्यांना चर्चेपासून दूर का ठेवले असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. तर हेच निर्माते ठाकरे यांच्यावरील चित्रपटाचे निर्माते ही होते याकडे लक्ष वेधले. दरम्यान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे अलीकडे अभ्यास करीत नाहीत, त्यांना विधान परिषदेत पाठवत नाहीत म्हणून ते फार निराशेतून बोलत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
सुशांत प्रकरणाशी भाजपाचा संबंध काय?; काँग्रेसकडून फडणवीसांचा 'त्या' व्यक्तीसोबतचा फोटो शेअर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा रद्द कराव्यात ही राज्य सरकारची भूमिका होती. त्यासाठी युवासेनेकडून आदित्य ठाकरेंनी याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. मात्र, राज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाकरे सरकार व युवासेनेला मोठा झटका बसला आहे. अंतिम परीक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. मात्र, युवा सेनेच्या आग्रहाखातर महाराष्ट्र सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नका, ही एकतर्फी भूमिका राज्य सरकार आतापर्यंत मांडत आले. परंतु, याबाबत युवा सेना व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावल्याने, याचा आमच्या विद्यार्थ्यांना फायदाच होईल. त्यांच्या पदवीला भविष्यात "व्हॅल्यू" राहील असेही ते म्हणाले.