शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

कराराची नोंदणीच नाही!, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे टोल वसुली; याचिकाकर्त्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 4:42 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसंबंधी राज्य सरकार, एमएसआरडीसी व आयआरबीमध्ये झालेल्या कराराची नोंदणी करण्यात आली नाही, अशी माहिती खुद्द एमएसआरडीसीने दिल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केला आहे. दरम्यान, आयआरबीने ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक टोल जमा केल्याप्रकरणी सकृतदर्शनी पुरावे नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसंबंधी राज्य सरकार, एमएसआरडीसी व आयआरबीमध्ये झालेल्या कराराची नोंदणी करण्यात आली नाही, अशी माहिती खुद्द एमएसआरडीसीने दिल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केला आहे. दरम्यान, आयआरबीने ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक टोल जमा केल्याप्रकरणी सकृतदर्शनी पुरावे नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावर यांनी केलेल्या याचिकेनुसार, आयआरबीने प्रकल्पाची पूर्ण रक्कम वसूल केली असल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली बंद करण्यात यावी. करारानुसार, २०१९ला टोल वसुली बंद होणार आहे. मात्र डिसेंबर २०१६मध्येच प्रकल्पाची रक्कम वसूल झाली आहे.आयआरबी सरकारची दिशाभूल करून सामान्यांकडून अधिक रक्कम वसूल करत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी व मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल बंद करावा, अशी विनंती वाटेगावकर यांनी याचिकेत केली आहे. त्यावर गेल्या सुनावणीत राज्य सरकारने याबाबत चौकशी सुरू केल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाने या चौकशीत आयआरबीविरुद्ध काही हाती लागले का? अशी विचारणा केली. त्यावर सरकारी वकिलांनी सकृतदर्शनी आयआरबीविरुद्ध काहीही हाती लागले नसल्याचे सांगितले.आयआरबीच्या वकिलांनीही अद्याप प्रकल्पाची रक्कम वसूल झाली नसल्याची माहिती न्यायालयाला दिली. प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज व राज्य सरकारला दिलेली रक्कम बँकांकडून कर्ज म्हणून घेतली आहे. कोट्यवधी रुपयांवर कोट्यवधी रुपये व्याजही द्यावे लागत आहे. याचिकाकर्ते या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आहे. ते १३ वर्षे गप्प का बसले, असा सवालही आयआरबीच्या वकिलांनी न्यायालयात केला.वाटेगावकर यांनी राज्य सरकार, एमएसआरडीसी व आयआरबीमध्ये झालेल्या कराराची नोंदणी न झाल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. नोंदणीच न झाल्याने आयआरबीला टोल वसूल करण्याचा अधिकार नाही, असे वाटेगावकर यांनी म्हटले. त्यावर न्यायालयाने या सर्व मुद्द्यांमध्ये आपण लक्ष घालू, असे म्हणत याचिकाकर्त्याला करारासंबंधी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी दिली. याचिकेवरील पुढील सुनावणी २३ आॅगस्टला आहे.