आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून व महाराष्टÑ वन्यजीव विभागाच्या वतीने माळढोक व इतर पक्षी गणनेच्या राज्यभरात केलेल्या सहा दिवसांच्या विशेष सर्वेक्षणात एकही माळढोक पक्षी आढळला नाही. पक्षी गणनेची ही मोहीम ३१ पथकांद्वारे राबविण्यात आली तर अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम असल्याचे सांगण्यात आले.डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था (वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया डेहराडून) देशभरात कार्यरत आहे. या संस्थेला महाराष्टÑातील माळढोक पक्ष्याच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. भारतीय वन्यजीव संस्था, महाराष्टÑ वन्यजीव विभाग, पक्षी निरीक्षकांना सोबत घेत २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यभरात एकाचवेळी माळढोक पक्षी विशेष सर्वेक्षण करण्यात आले. माळढोक सोबत हरीण, काळवीट, खोकड, लांडगा, ससा, चिंकारा व अन्य वन्यजीवांची गणना करण्यात आली. माळढोक पक्षी वावरणाºया जवळपास राज्यातील १५-१६ जिल्ह्यात हे विशेष सर्वेक्षण करण्यात आले. अशा प्रकारची माळढोक व सोबतच्या वन्यजीव पक्षाची गणना प्रथमच करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत नान्नज, गंगेवाडी(सोलापूर), वरोरा(चंद्रपूर), नाशिक परिसर, लातूर जिल्ह्याच्या काही भागात माळढोक पक्षी आढळला होता. प्रामुख्याने महाराष्टÑातील नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर माळढोक पक्षी वास्तव्यास होते. हे दरवर्षी होणाºया वन्यजीव विभागाच्या पक्षी निरीक्षणावेळी दिसून येत असे. यावर्षी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या विशेष सर्वेक्षणात नान्नजसह राज्यभरात एकही माळढोक पक्षी आढळला नसल्याचे संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. बिलाल हबीब यांनी सांगितले. ------------------ राज्यभरात जवळपास १५-१६ जिल्ह्यात २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान झाले सर्वेक्षण.- माळढोक पक्षी अभयारण्यातील अन्य पक्षांचीही गणना झाली असून अंतिम आकडेवारीसाठी दोन महिने लागतील.- राज्यातील ५३ हजार चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात माळढोक पक्षी विशेष सर्वेक्षण केले.- २१ सप्टेंबर गंगेवाडी, १३ आॅगस्ट नान्नज तसेच हिंगोली, नांदेड, बीड, बुलढाणा, उस्मानाबाद, औसा, -अक्कलकोटच्या काही भागात काही दिवसापूर्वी माळढोक आढळला असल्याची माहिती.- सांगोला तालुक्यातही माळढोक दिसल्याचे एका शेतकºयाने सांगितल्याची माहिती.------------राज्यभरात सर्वेक्षणाचे काम झाले आहे. सर्वेक्षणात एकही माळढोक पक्षी आढळला नसला तरी राज्यभरात १०-१२ ठिकाणी यापूर्वी पक्षी आढळल्याचे समोर आले आहे. कोणत्या जिल्ह्यात माळढोकचा व वन्यजीवांचा वावर आहे हे सर्वेक्षणात समोर आले आहे. हे सर्वेक्षण माळढोक संवर्धनासाठी फायद्याचे आहे.- डॉ. बिलाल हबीब,शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून-----------------------आज जरी माळढोक पक्षी आढळला नसला तरी कोणत्या भागात पक्षी वावरतो हे विशेष सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. भारतीय वन्यजीव संस्थेच्या वतीने राज्यातील माळढोक पक्षाचे विशेष सर्वेक्षण करण्यात आले. विशेष सर्वेक्षणात पक्षी दिसला नाही म्हणजे माळढोक नाही असे नाही. झाडाझुडपातील पक्षी दिसला नाही.- के.टी. सिंग,मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग पुणे--------------------सोलापूर जिल्ह्यातील तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील लगतच्या भागातील माळढोक व वन्यजीव पक्षांच्या सर्वेक्षणाचे काम १० पथकांनी केले. जिल्हाभरात एकही माळढोक पक्षी आढळला नाही. अन्य वन्यजीव प्राणी-पक्षीही कमीच दिसून आले; मात्र १३ आॅगस्ट रोजी नान्नजला माळढोक दिसला होता.- शाहीर खान,शोधकर्ता, भारतीय वन्यजीव संस्था
राज्यभरातील सर्वेक्षणात माळढोक दिसलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 2:44 PM
राज्यभरात केलेल्या सहा दिवसांच्या विशेष सर्वेक्षणात एकही माळढोक पक्षी आढळला नाही. पक्षी गणनेची ही मोहीम ३१ पथकांद्वारे राबविण्यात आली
ठळक मुद्देपक्षी गणनेची ही मोहीम ३१ पथकांद्वारे राबविण्यात आलीसहा दिवसांच्या विशेष सर्वेक्षणात एकही माळढोक पक्षी आढळला नाही राज्यातील ५३ हजार चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रात माळढोक पक्षी विशेष सर्वेक्षण केले