शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

खारघरनंतर वहाळमध्येही नो लिकर झोन

By admin | Published: April 26, 2016 2:36 AM

नो लिकर झोन करण्यासाठी आठ महिन्यांपासून महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सोमवारी मतदान घेण्यात आले.

नवी मुंबई : खारघरनंतर वहाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधील चार गावे व उलवे नोड नो लिकर झोन करण्यासाठी आठ महिन्यांपासून महिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सोमवारी मतदान घेण्यात आले. महिलांनी बहुमताने दारूबंदीच्या बाजूने कौल दिल्याने सुरू झालेला एक बार बंद होणार आहे तर प्रस्तावित १९ बारना गाशा गुंडाळावा लागणार आहे. महिलांच्या या एकजुटीचे पनवेल व उरण तालुक्यामधील सर्वांनीच अभिनंदन केले आहे.वहाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जावळे, बामणडोंगरी, मोरावे येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये हा परिसर नो लिकर झोन म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला होता. परिश्रम करून ग्रामस्थांनी लग्नातील अवाढव्य खर्च, हळदी समारंभात होणारे मद्यपान व इतर अनेक चुकीच्या प्रथा बंद केल्या होत्या. आदर्श ग्रामपंचायत म्हणून रायगड जिल्ह्यात या परिसराची ओळख निर्माण होत असताना आठ महिन्यांपूर्वी सरकारने वहाळ गावच्या शाळेजवळच रजत बारला परवानगी दिली. हा बार सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. महिलांनी या बारला विरोध करून तो बंद करण्यासाठी भव्य मोर्चा काढला होता. नो लिकर झोन करण्यासाठी चारही गावामधील महिलांनी सह्यांचे निवेदन रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीसाठी महिलांचे मतदान घेण्याचे निश्चित केले. मतदानासाठी किमान गावातील २५ टक्के महिलांनी मागणी करणे आवश्यक असते. यामुळे प्रशासनाने सह्यांचे निवेदन दिलेल्या महिलांच्या सह्यांची छाननी करण्यास सुरुवात केली. एक दिवस सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवेदनावरील सह्या व प्रत्यक्षात त्या महिलांना अधिकाऱ्यांसमोर सह्या करण्यास लावून त्याची सत्यता पडताळण्यात आली व अखेर २५ एप्रिलला मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली. वहाळ ग्रामपंचायत परिसरामध्ये दारूबंदीसाठी सुरू असलेल्या मतदानाकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दारूबंदीच्या बाजूने किती महिला मत देतात याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. परिसरातील महिला मंडळाने चार गावे व उलवे नोडमध्ये जनजागृती करून दारूची दुकाने आपल्या विभागात का नकोत, ही भूमिका समजावून सांगितली. सकाळी वहाळ, बामणडोंगरी, मोरावे, जावळेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान घेण्यात आले. महिलांनी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. ९० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनीही मतदान करून भावी पिढी व्यसनमुक्त राहील याची काळजी घेतली. कोणत्याही स्थितीमध्ये आमच्या गावात बार होऊ देणार नाही, असा संकल्प सर्वांनी केला. पनवेल बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचे रवीशेठ पाटील यांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.