ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : मुंबई महानगरपालिकेची २०१७ ची निवडणूक जिंकण्याच्या उराद्याने तयारीला लागा, या निवडणूकीत भाजपाला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, मतांसाठी आतापर्यंत काही पक्षांनी झोपडपट्टीवासियांचा उपयोग केला. इतर पक्ष आणि भाजपामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते पक्षाच्या मेळाव्यात बोलतं होते.
आजच्या भाजपच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजानिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पुनम महाजन यांच्यासह मुंबईतील भाजपचे सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीवेळी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी अशिष शेलार यांची पुन्हा निवड करण्यात आली. तसेच महापालिका निवडणुकीसाठी ११४ + चे ध्येय समोर ठेऊन स्वबळावरच निवडणूक लढण्याचा निर्धार पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील भाजपला मिळावलेल्या वर्चस्वामुळे मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाची खुर्ची खुणावते आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवून महापौरपदी भाजपचाच उमेदवार बसवण्याचा निर्धार आज झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -
ट्रान्स हार्बर लिंकचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑक्टोबरमध्ये भूमिपूजन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
नवी मुंबई विमानतळासाठी केंद्र सरकारने तातडीने ८ परवानग्या दिल्या
पक्की घरं देण्यासाठी सर्वेक्षण सुरु
२०१७ च्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकित कोणीही रोखू शकत नाही
मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी जपानच्या जायका कंपनीने २३ हजार कोटी दिले
मतांसाठी आतापर्यंत काही पक्षांनी झोपडपट्टीवासियांचा उपयोग केला.
२०१९ पर्यंत मुंबईचे चित्र बदलेल
वर्षानुवर्षे रखडलेली कामे पंतप्रधांनी मार्गी लावली
सामान्यांना १०-१५ लाखात घरे उपल्ब्ध करुन देणार