मुंबई: आज मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, यावेळी राज्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि इतर काही मंत्री आहेत जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. यामुळे महाराष्ट्राच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सर्वात भ्रष्ट सरकार म्हणुन नोंद होणारमुंबईमध्ये झालेल्या भाजपच्या कार्याकारणी बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं. सुरुवातील फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, पुढे बोलताना महाराष्ट्राच्या विश्वासहर्तेवर प्रश्न निर्माण झाल्याचं म्हणाले. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि मंत्री आहे की जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही. आमच्या काळात प्रकल्पांवर चर्चा व्हायची, पण आज चर्चा कशावर होते तर गांजा, हर्बल तंबाखूवर. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणुन यांची नोंद होईल, अशी टीका फडणवीसांनी केली.
2024 आधी राज्यात सरकार आलं तर बोनस समजूफडणवीस पुढे म्हणाले, राज्यातले सध्याचे सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरत असून जनतेच्या कल्याणा करता आपल्याला मैदानात उतरावच लागेल. 2024 आधी राज्यात आपले सरकार आले तर बोनस समजू. तसं जर झालंच तर जनतेला उत्तम पर्याय आपण देऊच. पण येणाऱ्या काळात भाजपाचे स्वत:च्या भरवशाचे स्वत:चं सरकार आपण आणून दाखवू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी यावेळी कोरोना संकट, वीजबील थकबाकी, लसीकरण, शेतकरी कर्जमुक्ती योजना, कुपोषण, इंधन दरकपात अशा सर्वच मुद्द्यांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आता रस्त्यावर उतरुन संघर्ष करावाच लागेलते पुढे म्हणतात, सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कपडे काढले तरी हे निर्लज्ज आहे. आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. ज्यापद्धतीने देशद्रोह्यांबरेबर तुमची पार्टनरशीप, अवैध रेती, अवैध दारू असाच प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. भ्रष्टमार्गाने चालायची सवय नोकरशाहीला लागली तर ती लवकर जात नाही. कोट्यावधी रुपये देवून लोक पदावर येत असतील तर काय होईल. आपण या विरूद्ध संघर्ष करायचा आहे, असंही ते म्हणाले.