अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:41 IST2024-12-18T11:35:38+5:302024-12-18T11:41:21+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेले नाही, यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

No one should do anything like putting shoes on Ajit Pawar's photo or using abusive words'; Chhagan Bhujbal appeals to workers | अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Maharashtra Politics ( Marathi News ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. ३९ नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू असून  त्यांनी उघड नाराजीही बोलून दाखवली आहे. दरम्यान, आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. यात अजित पवार यांच्याविरोधात छोषणाबाजीही सुरू आहे. आता यावरुन छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. 

७ व्या वेतन आयोगानुसार विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना किती पगार मिळतो?

आज आमदार छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. भुजबळ म्हणाले, मी मागच्या दोन दिवसापासून सांगत आहे की, कुणीही अजितदादा पवार यांच्या फोटोला चप्पल मारणे. किंवा अपशब्द वापरणे, हे काहीही करु नये. आतापर्यंत जे कोणी केलं ते ठीक आहे. पण, यापुढे जे करतील याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाहीत. ते कोणीतरी वेगळे असतील. कारण तुमचा राग आणि दु:ख व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला कोणतीही मनाई नाही. पण ती चांगल्या आणि सुसंस्कृत शब्दात व्यक्त झाली पाहिजे, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केले. 

पुण्यात भुजबळांच्या समर्थकांचे अजितदादांविरोधात आंदोलन 

पुण्यात भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच वाद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ समर्थक ओबीसी कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केले आहे. यावरून राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. जशास तसे उत्तर दिले जाईल नाही ते उद्योग करू नका नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे. 

अजित पवारांविरोधात जोडे मारो आंदोलन केल्याने राष्ट्रवादी नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जशासतसे उत्तर देण्याची तयारी करत आहेत. नको ते उद्योग करू नका नाहीतर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. 

Web Title: No one should do anything like putting shoes on Ajit Pawar's photo or using abusive words'; Chhagan Bhujbal appeals to workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.