शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

मेडिगड्डा धरणाने एकही गाव बुडणार नाही

By admin | Published: May 10, 2016 3:55 AM

गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर तेलंगणमध्ये बांधण्यात येणाऱ्या मेडिगड्डा धरणाने महाराष्ट्र किंवा तेलंगणमधील एकही गाव किंवा घर पाण्याखाली जाणार नाही.

हैदराबाद: गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर तेलंगणमध्ये बांधण्यात येणाऱ्या मेडिगड्डा धरणाने महाराष्ट्र किंवा तेलंगणमधील एकही गाव किंवा घर पाण्याखाली जाणार नाही. दोन्ही राज्यांच्या जलसंपदा, पाटबंधारे व कमांड क्षेत्रविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धरणामुळे पाण्याखाली जाणाऱ्या क्षेत्रांचे संयुक्त सर्वेक्षण केले असून महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मान्यतेनुसारच हे धरण बांधले जात आहे, असे तेलंगणचे पाटबंधारेमंत्री टी. हरीश राव यांनी सोमवारी येथे सांगितले.या धरण प्रकल्पाच्या कामाला अंतिम स्वरूप देण्यासाठी हरीश राव उद्या मंगळवारी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटणार आहेत. त्यावेळी आपण या धरणाच्या कामाच्या पायाभरणी सोहळ््याचे निमंत्रणही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊ, असेही राव यांनी सांगितले.या धरणाने एकूण ११९.५ हेक्टर क्षेत्र बाधित होईल व त्यात खासगी व सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा समावेश असेल. धरण बांधण्यासाठी ३,२५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या कामासंदर्भात महाराष्ट्र व तेलंगण यांच्यात गेल्या वर्षी १७ फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार झाला होता.दोन्ही राज्यांतील आधीच्या काँग्रेस सरकारांनी शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प हाती घेतला नाही, असा आरोप करीत मंत्री राव यांनी असा दावा केला की, तेलंगणचे स्वतंत्र राज्य झाल्यावर तेलंगण राष्ट्र समितीच्या सरकारने केंद्रीय जलआयोग व महाराष्ट्र सरकार यांच्याकडे या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. राव यांनी असेही सांगितले की, १,४८० टीएमसी पाणी समुद्राला जाऊन मिळून वाया जाते. त्यापैकी तेलंगणच्या वाट्याचे २० टीएमसी पाणी आम्ही या धरणात साठविणार आहोत. दोन ते तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे पाणी करीमनगर, मेडक, वारंगळ व निजामाबाद जिल्ह्यांना व नलगोंडा जिल्ह्याच्या काही भागाला मिळेल.धरणामुळे एकूण ३,६०० एकर जमीन पाण्याखाली जाईल व महाराष्ट्रातील २५ ते २६ गावेही त्यामुळे प्रभावित होतील. पण एकही घर पाण्याखाली जाणार नाही. आम्ही प्रथम भारतीय आहोत व ‘जगा व इतरंनाही जगू द्या’ हे आमचे धोरण आहे. महाराष्ट्रासह इतरही शेजारी राज्यांशी तेलंगणला सलोख्याचे संबंध ठेवायचे असून रस्ते, पाणी, वीज तसेच कायदा आणि सुव्यवस्था याबाबतीत आमचे धोरण सहकार्याचे असेल, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)