शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मराठा मोर्चात राजकीय भाषणं होणार नाहीत- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 3:42 PM

मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे.

ठळक मुद्देवीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील तसंच राजकीय नेतेही हजर राहतील.मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे

मुंबई, दि. 8- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील तसंच राजकीय नेतेही हजर राहतील. मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे. राजकीय पुढारी जरी यामध्ये सहभागी झाले तरी तिथे कुठल्याही नेत्याला भाषण करता येणार नसल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजातील मुला-मुलींना शिक्षणात आणि नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं, या मागण्यांसाठी मुंबईतून भव्य मोर्चा निघेल. या मोर्चातील एका शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे. शिष्ठमंडळाच्या या निवेदनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य उपचार करतील, अशी आशा असल्याचंही नारायण राणे म्हणाले आहेत. मंगळवारी अधिवेशना दरम्यान माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाकडून आपापल्या जिल्ह्यात मोर्चे काढले गेले. आत्तापर्यंत निघालेल्या प्रत्येक मोर्चात मराठा समाजाची आरक्षणासाठीची एकजुट दिसून आली. बुधवारीही तसाच भव्य मोर्चा मुंबईतून निघणार आहे. वीस ते पंचवीस लाख लोक यामध्ये सहभागी होणार असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत. कुठलाही समाज मागासलेला असतो तेव्हा त्याच्या आरक्षण देण्याचा विचार केला जातो. आजपर्यंत अनेक समाजांनी आरक्षणाची मागणी केली तेव्हा मराठा समाजाने त्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे उद्याच्या या मोर्च्यात जात-धर्म न पाहता उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यावर मुख्यमंत्री सभागृहात त्यावर उत्तर देणं अपेक्षित आहे. या मोर्चातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, अशी आशासुद्धा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. 

आतापर्यंत ५७ मूक मोर्चे झाले असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.

मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चेंबूरपासून वाहतुकीला बगलमुंबईतील भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येईल.

मोर्चेकऱ्यांसमोर संयुक्त समितीचा प्रस्ताव!मराठा समाजाच्या मोर्चाद्वारे करण्यात येणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि मोर्चेकºयांचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव, राज्य शासनाकडून मोर्चाच्या शिष्टमंडळास दिला जाणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. मोर्चाच्या आधी सरकार आणि मोर्चेकºयांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा