जळगाव : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येनंतर सादरे यांच्या पत्नीने आपल्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. अशोक सादरे यांना आपण मागील वर्ष दीड वर्षापासून भेटलो नव्हतो. त्यांचे निलंबन व्हावे, यासाठी मी कुठलाही दबाव कुणावरही आणला नाही. या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही. शासनाने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व तथ्य आढळल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, असे स्पष्टीकरण राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. सादरे यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी यांनी महसूलमंत्री खडसे हे आपल्या पतीचा मानसिक छळ होण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.सादरे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यांनी बोदवड, जळगाव, नवी मुंबई येथे कार्यरत असताना वरिष्ठांशी गैरवर्तन केले. ते तीनवेळा निलंबित झाले होते. जळगावात सादरे यांच्यावर खंडणीचा गुन्हा हा न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल झाला.पोलीस अधीक्षकांची विभागीय चौकशीसादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्यांच्यावर कारवाई करणार का?असे विचारले असता खडसे म्हणाले, ‘सुपेकरांवर गुन्हा दाखल झाला आहे, पण आताच त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही. त्यांची विभागीय चौकशी केली जाईल.’
निलंबनासाठी दबाव आणला नाही
By admin | Published: October 18, 2015 2:30 AM