मुंबई : ओबीसींच्या नावाखाली मराठा आरक्षण देण्यास बारा बलुतेदार महासंघाने विरोध केला आहे. तसे केल्यास मराठा समाजामार्फत होणा:या कुरघोडीत ओबीसी समाज मागास होईल, अशी भीती महासंघाने व्यक्त केली.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे म्हणाले, कुंभार, सुतार, नाभिक, गुरव, शिंपी, बेलदार, धोबी, केवट, सोनार, लोहार, साळी आणि भोई या बारा बलुतेदार जाती आजही उपेक्षित आहेत. सुमारे दोन कोटी लोकसंख्येच्या या समाजातील विद्याथ्र्याच्या गळतीचे प्रमाण 9क् टक्के आहे. त्यामुळे या जातींसाठी 5क् निवासी शाळा स्थापन करण्याची मागणी दळे यांनी केली आहे.
7 जुलै रोजी घाटकोपर येथे आत्मसन्मान परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत बारा बलुतेदार जातींसह इतर छोटय़ा छोटय़ा समुदायांतील अन्य 272 जातींतील कार्यकर्ते, युवक, ी-पुरुष सामील होणार आहेत.
मराठा, मुस्लिम समाजाला न्याय -अशोक चव्हाण
मराठा व मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय स्वागतार्ह असून दोन्ही समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारने पार पाडली, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी येथे व्यक्त केली़
मुस्लीम आरक्षण घुसवून अन्याय -विनोद तावडे
राणो समितीने मराठा समाजाला 2क् टक्के आरक्षणाची शिफारस केली असताना मंत्रिमंडळाने मात्र केवळ 16 टक्केच आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन या समाजावर अन्याय केला आहे. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये मुस्लीम समाजाचे आरक्षण घुसविले आहे, अशी टीका विनोद तावडे यांनी केली.