पुणे : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) मध्ये प्रवेशाच्या दुसºया फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश झाले आहेत. एकूण ४८ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्यापही ९३ हजार जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे प्रवेशासाठी तब्बल २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केलेली आहे. राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये एकुण ९२ हजार ७०६ तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार ३३६ अशी एकुण १ लाख ४२ हजार ४२ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार ८३९ जागांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून भरले जाणार आहे. या आॅनलाईन प्रक्रियेअंतर्गत नुकतीच दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. पहिल्या फेरीमध्ये एकुण ३३ हजार ३६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दुसºया फेरीमध्ये एकुण ५२ हजार १४७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीअखेर शासकीय संस्थांमधील ३८ हजार ५९३ तर खासगी आयटीआयमधील १० हजार ३०२ जागांवरच प्रवेश झाले आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.तिसºया फेरीमध्ये आॅनलाईन प्राधान्यक्रम भरण्याची मुदत दि. २५ जुलै रोजी संपली आहे. दि. २९ जुलै रोजी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर दि. ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील. दि. ३१ जुलैपासून चौथी प्रवेश फेरी सुरू होणार आहे. त्यानंतर समुपदेशन फेरीतून प्रवेश दिले जातील. --------------जागा रिक्त राहणारदुसºया फेरीअखेर केवळ ३४ टक्के झाल्याने मोठ्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने खासगी संस्थांमधील रिक्त जागांची संख्या तुलनेने अधिक असणार आहे. या संस्थांमध्ये आतापर्यंत केवळ २० टक्के प्रवेश झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये एकुण २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती करून सध्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. ----------आयटीआय प्रवेशाची स्थितीसंस्था प्रवेश क्षमता झालेले प्रवेश टक्केवारीशासकीय ९२,७०६ ३८,५९३ ४१.६३खासगी ४९,३३६ १०,३०२ २०.८८एकुण १,४२,०४२ ४८,८९५ ३४.४२------------
‘आयटीआय’ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 6:48 PM