ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - कडाक्याच्या उन्हाळ्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये 98 दिवसांचा जलसाठा आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात पाण्याचे टेन्शन मिटले आहे. दोन वर्षांपूर्वी अपु-या पावसाने मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. वर्षभर पाणीकपातीचा सामना मुंबईकरांना करावा लागला होता. परंतू गेल्यावर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन निवळले. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीनेही मुंबईचा जलसाठा वाढवला. त्यामुळे मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली असून मुंबईकरांच्या घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र भर पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही, याचा मुंबईकरांना दिलासा आहे. सद्यस्थितीत तलावांमध्ये तीन लाख 67 हजार 991 दशलश लीटर जलसाठा आहे. तीन महिने मुंबईची तहान भागेल, एवढा हा जलसाठा असल्याने जुलैपर्यंत पाणीची चिंता नाही.असा आहे जलसाठा (आकडेवारी दशलश लीटरमध्ये)वर्ष जलसाठा2017 - तीन लाख 67 हजार 991 2016- दोन लाख 41 हजार 366 2015- दोन लाख 96 हजार 460मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर्स पाणीपुरवठा होतो. मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200 दशलश लीटर्स एवढी आहे.दररोज 25 ते 30 टक्के म्हणजे सुमारे नऊशे लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.
कडक उन्हाळ्यातही पाण्याचे नो टेन्शन
By admin | Published: May 16, 2017 9:21 PM