ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ५ - आमचं सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासून शेतक-यांवर संकटच येत आहेत असं सांगत कोणत्या मुहूर्तावर आम्ही सत्तेत आलो ते कळत नाही असं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरींनी शेतक-यांच्या व्यथा मोदी सरकारच्या काळातही कमी न होता वाढल्याचं मान्य केलंय.
एका सभेत बोलताना गडकरींनी गेल्या वर्षी गारपिटीनं झोडपलं, तर यंदा मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात भीषण दुष्काळ असल्याचं नमूद केलं. गेल्या वर्षी शेतक-यांचे अतोनात हाल झाले, यंदाचं वर्ष तरी चांगलं जाईल असं वाटलं होतं, पण दुष्काळ आहेच. कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ पडतो आणि शेतक-यांचं संकट वाढत असं सांगणा-या गडकरींनी मात्र, काहीही झालं तरी सगळ्यांनी मिळून या आव्हानाचा सामना करू व त्यावर मात करू अशी अपेक्षा व्यक्त केली.