शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

३१ कारखान्यांकडील अडीचशे कोटींच्या एफआरपीची फुटेना कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:57 PM

थकीत एफआरपीमुळे यंदाचा हंगाम जास्त चर्चेत राहिला.

ठळक मुद्दे३१ कारखाने : काही थकबाकीदारांकडे यंदाही थकबाकीसहा मे अखेरीस राज्यातील ६८ कारखान्यांवर आरआरसी कारवाई गाळप हंगाम संपूनही ३ हजार ६०७ कोटी ५२ लाख रुपयांची कारखान्यांकडे थकबाकी साखर आयुक्तालयाकडून रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) काढण्याचा धडाका सुरु

पुणे : साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) रक्कम थकविल्या प्रकरणी साखर आयुक्तालयाकडून रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) काढण्याचा धडाका सुरु आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत ३१ कारखान्यांकडे तब्बल अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील काही कारखाने यंदाही थकबाकीदार आहेत. थकबाकीची ही कोंडी साखर आयुक्तालय कधी फोडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. थकीत एफआरपीमुळे यंदाचा हंगाम जास्त चर्चेत राहिला. शेतकरी संघटनांनी केलेले आंदोलन, साखर कारखान्यांकडून एफआरपी देण्यात होत असलेला विलंब यामुळे सहा मे अखेरीस राज्यातील ६८ कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. यंदा एप्रिल अखेरीस राज्यातील कारखान्यांकडे २२ हजार ४२ कोटी रुपयांचे देणे होते. त्यापैकी १८ हजार ८२१ कोटी २२ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. गाळप हंगाम संपूनही ३ हजार ६०७ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. यंदा गाळप हंगाम घेतलेल्या १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. शुगरकेन कंट्रोलन कायद्यानुसार शेतकºयांची एफआरपीबाबत वैयक्तीक करार झालेला नसल्यास, त्यांना १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. राज्यातील ३१ साखर कारखान्यांकडे २०११-१२ पासून ते २०१७-१८ या हंगामातील तब्बल २४९ कोटी ५२ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहेत. त्यात बीडचा जय भवानी साखर कारखाना, साताºयाचा रयत साखर कारखाना यांच्याकडे या वर्षासह पुर्वीची देखील थकबाकी दिसून येते. रयतकडे २०१४-१५मध्ये ९ कोटी ८१ लाख आणि बीडच्या जयभवानीकडे ३ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी दिसत आहे. यंदा देखील दोन्ही कारखान्यांकडे थकबाकी असून, त्यातील जयभवानी कारखान्यावर या वर्षी आरआरसी कारवाई देखील करण्यात आली आहे. -----------------२०११-१२ ते १७-१८ या गाळप हंगामातील प्रमुख थकबाकीदार (रक्कम कोटीत)

दौलत-कोल्हापूर                              १९.९६    वसंतदादा शेतकरी-सांगली                ५५.४रयत-सातारा                                   ९.८१न्यू फलटण                                     ४८.४१स्वामी समर्थ-सोलापूर                     ९.०७श्री शंकर-सोलापूर                            ३०.७६आर्यन शुगर-सोलापूर                      २१.०५विजय शुगर-सोलापूर                     २०.१७शंभू महादेव-उस्मानाबाद               ११.८७चोपडा-जळगाव                             १२.८२समर्थ-जालना                               ३.६५जयभवानी-बीड                             ३.२६एच. जे. पाटील-नांदेड                    ५.५७महाराष्ट्र शेतकरी-परभणी             ९.९२         

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार