सोलापूर : भारतीय राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नाही, असा इशारा माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी येथे मंगळवारी बोलताना दिला. आरक्षणावरून देशभरात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर शिंदे यांनी भाष्य केले. आरक्षण बदलण्यासाठी संसदेची मान्यता लागते. सन २00२ मध्ये भाजपा सत्तेवर आल्यावर राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी मी त्याला प्रखर विरोध केला होता, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दुष्काळी स्थितीवर मात करण्यास फडणवीस सरकारकडे नियोजन नसल्याचा आरोप त्यांनी केला. पाऊस लांबल्यानंतर शेतकऱ्यांना करावयाच्या मदतीचे नियोजन आधीच केले असते तर आज ही स्थिती आली नसती. शेतकरी होरपळून निघाला तरी सरकारने आतापर्यंत मदत न करता कोरडी आश्वासने दिली, असे ते म्हणाले.
आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नाही - शिंदे
By admin | Published: September 23, 2015 12:50 AM