मुंबई : शालेय शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आक्रमक झाले आहेत. येत्या १० दिवसांत बैठक घेऊन मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर बारावी बोर्ड पेपर तपासणीस असहकार करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे.महासंघाच्या माहितीनुसार, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण झालेले नाही. (प्रतिनिधी)
...तर बारावीच्या पेपर तपासणीत असहकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2016 1:48 AM