मुंबई : ‘हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही’ या नियमाची अंमलबजावणीबाबत मुंबई वगळता राज्यभरात ‘असहकारा’ची भूमिका घेण्याचा निर्णय पेट्रोल-डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. १ आॅगस्टपासून राज्यभरात हा नियम लागू होणार आहे.दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करून देखील त्याचे पालन केले जात नसल्याचे लक्षात आल्याने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधिमंडळात ‘हेल्मेट नाही, तर पेट्रोलही नाही’, (नो हेल्मेट, नो पेट्रोल) या नियमाची घोषणा केली. वस्तुत: सुरुवातीला मुंबईपुरतीच या नियमाची अंमलबजावणी करण्याचे पेट्रोल-डिलर्स असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीत ठरले होते. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर राज्यभरात हा नियम लागू करण्यात येणार होता. मात्र १ आॅगस्टपासून राज्यभर याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आल्याने असोसिएशनने आता त्याला जोरदार विरोध केला आहे. मुंबईबाहेर या निर्णयाला ‘असहकार’ करण्याची घोषणाच असोसिएशनने केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत असोसिएशनकडून याबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.पेट्रोल पंपचालकांवर कारवाईपेट्रोल पंपचालकाने दुचाकीस्वारास पेट्रोल देण्यात येऊ नये, असे शासनाने काढलेल्या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>हेल्मेट परिधान केलेले असल्याशिवाय पेट्रोल पंपचालकाने दुचाकीस्वारास पेट्रोल देऊ नये, असे शासनाने काढलेल्या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यालाही असोसिएशनकडून विरोध करण्यात आला आहे. परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना मदत म्हणून मुंबईत या निर्णयाला सहकार्य करण्यास तयार झालो. मात्र राज्यभर त्याची अंमलबजावणी करणार असल्याने, ते मात्र मान्य नाही. मुंबईबाहेर आम्ही सहकार्य करणार नाही. शासनाचा हा नियम आम्ही पाळणार नाही. याबाबत दोन ते तीन दिवसांत निर्णय घेऊ.- उदय लोध, अध्यक्ष, राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशन>एका पेट्रोल पंपावर दोन पोलीस तैनात करण्याचे मान्य करण्यात आले असले तरी रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर सुरक्षा देण्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे रात्रीच्या सुरक्षेवर काय असा सवाल असोसिएशनकडून उपस्थित करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपचालकांचा असहकार
By admin | Published: July 23, 2016 4:42 AM