शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
2
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
3
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
4
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
5
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
6
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
7
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
8
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
9
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
10
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
11
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
12
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
14
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
15
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
16
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
17
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
18
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
19
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
20
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव

मराठी, गुजरातींबरोबरच उत्तर भारतीयांचा बोलबाला

By admin | Published: January 20, 2017 2:22 AM

तीन प्रभाग मिळून तयार झालेल्या १०३ या प्रभागात मराठी मतदारांचा बोलबाला अधिक आहे.

मुंबई : तीन प्रभाग मिळून तयार झालेल्या १०३ या प्रभागात मराठी मतदारांचा बोलबाला अधिक आहे. तब्बल १४ हजार २४९ मराठी मतदार या प्रभागात आहेत. त्याचबरोबर गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्याही त्यांच्या खालोखाल आहे. त्यामुळे या मतदारांची मते मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तसेच मूलभूत समस्यांबरोबरच पुनर्विकास प्रचाराचा मुद्दा असेल.मुलुंड पश्चिमेकडील या प्रभागात एकूण ४४ हजार ५०४ मतदार आहेत. मराठी (१४,२४९ ), गुजराती (१३, १३१), उत्तर भारतीय (११,१९३), इतर (१,२७१) मतदारांचा समावेश आहे. यामध्ये निर्मल लाइफ, हेक्स्ट, मॅरेथॉन, छेडा पेट्रोलपंप, वीणानगर, वसंत आॅस्कर या विभागांचा समावेश तर भांडुप कॉम्प्लेक्स, विहार लेक, वीणानगर, घाटीपाडा या विभागांचा यात भरणा आहे. ९८, ९९ आणि १०३ हे तीन प्रभाग मिळून १०३ हा प्रभाग बनविण्यात आला आहे. हा प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी होता. भाजपाच्या नगरसेविका येथून निवडून आल्या होत्या. गरीब व उच्चमध्यमवर्गीय मतदारांचा हा प्रभाग आहे. मात्र आता नव्या रचनेमुळे हा प्रभाग खुला झाल्यामुळे उमेदवारांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. भाजपाबहुल असलेल्या या वॉर्डमध्ये भाजपाचे गटनेते यांनी फिल्डिंग लावली आहे. मूलभूत समस्यांबरोबरच पुनर्विकासाचा मुद्दा या भागातील प्रमुख समस्या ठरणार आहे. मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारीही रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारांना खूश करण्यासाठी उमेदवार विविध शक्कल लढवित आहेत. मराठीबरोबरच गुजराती व्यवस्थित असावी म्हणून इच्छुक उमेदवारांपैकी काहींनी गुजराती शिकण्यासाठी शिकवणी वर्गही लावले आहे. तिकीट मिळण्याची शाश्वती असलेल्या उमेदवारांनी घरोघरी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. कुठे वडापाव दिला जातोय तर कुठे खमण ढोकळ्याबरोबरच भेळपुरीचा बेत आखला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. (प्रतिनिधी)