उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल: निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 10:26 PM2018-10-07T22:26:29+5:302018-10-07T22:30:46+5:30

उत्तर भारतीयांमुळे मुंबई-महाराष्ट्र चालतो, असं निरुपम यांनी म्हटलं

north indians runs mumbai and maharashtra says congress leader sanjay nirupam | उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल: निरुपम

उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल: निरुपम

googlenewsNext

नागपूर: उत्तर भारतीय माणूस मुंबई-महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवलं तर महाराष्ट्र ठप्प होईल, असं विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. उत्तर भारतीय मंडळी महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रात सक्रीय आहेत. हीच माणसं पूर्ण मुंबई चालवतात. त्यांनी जर ठरवलं तर सर्वकाही ठप्प होऊ शकतं. त्यामुळे त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका, असं वादग्रस्त वक्तव्य निरुपम यांनी केलं आहे. ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते. 

उत्तर भारतीय मंडळी संपूर्ण महाराष्ट्र चालवतात, असं संजय निरुपम यांनी म्हटलं. 'उत्तर भारतातून महाराष्ट्रात आलेला माणूस सर्व कामं करतो. तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत. उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळं-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे,' असं निरुपम म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्र उत्तर भारतातील मंडळीच चालवतात, असा दावादेखील त्यांनी केला. 'उत्तर भारतीय पूर्ण मुंबई चालवतात. त्यांनी जर ठरवलं, तर मुंबई ठप्प होऊ शकते. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही,' असं निरुपम म्हणाले. त्यामुळे आम्हाला काम बंद करायला भाग पडू नका, असा अप्रत्यक्ष इशारादेखील त्यांनी दिला.

Web Title: north indians runs mumbai and maharashtra says congress leader sanjay nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.